आपला जिल्हाताज्या घडामोडी

स्व. सा. रे .पाटील स्मृती कथा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

स्व. सा. रे .पाटील स्मृती कथा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

शिरोळ /एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा बक्षीस समारंभ उत्साहात पार पडला. श्री दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक, उद्यानपंडित गणपतराव पाटील (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

 

 प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. साहित्य सहयोग दीपावलीचे संपादक सुनील इनामदार यांनी स्वागत केले. जेष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा. डाॅ. मोहन पाटील यांनी स्व. सा. रे. पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन कथा स्पर्धेच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. 

         कवयित्री आशा कुलकर्णी यांच्या ‘काव्यरंग’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिका, लेखिका नीलमताई माणगावे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी काव्यरंग कथासंग्रहाबद्दल प्रस्तावना केली. नीलमताई माणगावे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, डॉ. अभिषेक उदगावकर, कथालेखिका सौ. सरस्वती येडसे यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या कथाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. इंद्रधनुष्य मासिकाचे संपादक गणपतराव पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना विजेत्या कथाकारांना शुभेच्छा देऊन नव साहित्यिकांनी नवनवीन लेखन करून समाज परिवर्तनाच्या कार्यात हातभार लावावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी केले तर आभार डॉ. दगडू माने यांनी मानले. 

 श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शेखर पाटील, महेंद्र बागे, अमर चौगुले, आशा कुलकर्णी, श्री. पवार, पाटलोबा पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजेंद्र मुठाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??