ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परिवहन विभागाचे नागरिकांना बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चलान लिंक्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन .

परिवहन विभागाचे नागरिकांना बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चलान लिंक्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन .

मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

राज्यात वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने नागरिकांना बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स आणि खोट्या ई-चालान लिंक्सपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन अशा सेवांच्या नावाखाली सायबर गुन्हेगार नागरिकांची वैयक्तिक माहिती आणि बँक खाती लुटत असल्याचे अनेक प्रकरणे विभागाच्या निदर्शनास आली आहेत.

फसवणूक करणारे “चलन बाकी आहे”, “परवाना सस्पेंड होणार आहे”, “तात्काळ पेमेंट करा अन्यथा कायदेशीर कारवाई होईल” असे धमकीचे एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवून अनधिकृत पेमेंट लिंक्स पाठवत आहेत. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की आरटीओ किंवा परिवहन विभाग कोणत्याही परिस्थितीत व्हॉट्सॲपवरून पेमेंट लिंक पाठवत नाही. तसेच “RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “eChallan Pay.apk” अशी नावे असलेल्या अज्ञात ॲप फाइल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील डेटा चोरीला जाण्याचा मोठा धोका आहे.               नागरिकांनी फक्त vahan.parivahan.gov.in, sarathi.parivahan.gov.in, parivahan.gov.in आणि echallan.parivahan.gov.in या gov.in डोमेन असलेल्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करावा. .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील संकेतस्थळांवर वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती टाकू नये, असेही विभागाने बजावले आहे.                                                                          कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबरक्राईम पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी किंवा सायबर फसवणूक हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा जवळच्या जिल्हा सायबर पोलीस स्टेशनात जाऊन फिर्याद दाखल करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी केले आहे.

“एक चुकीची क्लिक संपूर्ण बँक खाते रिकामे करू शकते त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??