आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

स्व. सा. रे .पाटील स्मृती कथा स्पर्धेचा गुरुवारी बक्षीस समारंभ.                                                     

स्व. सा. रे .पाटील स्मृती कथा स्पर्धेचा गुरुवारी बक्षीस समारंभ.                                                       

शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

साहित्य सहयोग दीपावली व मासिक इंद्रधनुष्य यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्व. आम. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती अखिल भारतीय मराठी कथा स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक, उद्यानपंडित गणपतराव पाटील (दादा) हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार प्रा. डाॅ. मोहन पाटील तसेच श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन शरदचंद्र पाठक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमात आशा कुलकर्णी यांच्या ‘काव्यरंग’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिका, लेखिका नीलमताई माणगावे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमास साहित्यिकांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, असे आवाहन साहित्य सहयोगचे सुनील इनामदार व इंद्रधनुष्य मासिकाचे कार्यकारी संपादक संजय सुतार यांनी केले आहे. सदर कार्यक्रम दत्त कारखाना मुख्य इमारतीच्या वरील हाॅल मध्ये होणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??