दळवीज आर्टच्या विद्यार्थ्यांचा चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

दळवीज आर्टच्या विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
कोल्हापूरला कलेची एक मोठी परंपरा आहे . हीच कोल्हापूरची खरी ओळख . ही ओळख काळाच्या कसोटीवर टिकून राहावी वाढत राहावी आणि बहरावी यासाठी इथल्या कलाकारांनी त्यांच्या कलाकृतीच्या आर्थिक गणिताविषयी गंभीर असायला हवे आणि यासाठी भीमा बिल्डर्स च्या माध्यमातून काही प्रयत्न करता येईल . आपण यासाठी ठोस काम करू. असे आश्वासक शब्द भीमा बिल्डर्स चे सर्वेसर्वा अभिजीत मगदूम यांनी व्यक्त केले . १ ते २५ या ग्रुपच्या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
दळवीज आर्टचे प्राचार्य श्री अजय दळवी, ज्येष्ठ चित्रकार श्री धर्माधिकारी, पुण्यातील चित्रकार सुरेंद्र कुडपणे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित कला रसिकांशी संवाद साधला.
दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट आणि प्रा.गिरीश उगळे यांच्या मार्गदर्शनाखाली 2012 -13 ला उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेली ही कलाकार मंडळी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र येऊन चित्र- प्रदर्शन आयोजित करत असतात.या वर्षीच्या चित्रप्रदर्शनामध्ये गिरीश उगळे,प्रशांत सुतार, रामचंद्र मेस्त्री, नितीन गावडे, प्रशांत भिलवडे, योगेश साटम ,श्रद्धा पोंबुर्लेकर- साटम,दीपक भुइंगडे जयसिंग चव्हाण राहूल रेपे आणि सत्यजित निगवेकर या चित्रकार, शिल्पकारांच्या कलाकृती आहेत सदरचे चित्र प्रदर्शन दिनांक 21 ते 27 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु रहाणार आहे.कला रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



