ताज्या घडामोडीदेश विदेश

इस्रोचा नवा इतिहास : ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक–2’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण – थेट स्मार्टफोनवर मिळणार 4G व 5G सेवा

इस्रोचा नवा इतिहास : ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक–2’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण – थेट स्मार्टफोनवर मिळणार 4G व 5G सेवा

श्रीहरिकोटा /वृत्तसेवा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने आज पुन्हा एकदा अंतराळ संशोधनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद राहील, अशी कामगिरी बजावली आहे. अमेरिकन कंपनी ‘एएसटी स्पेसमोबाईल’चा ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक–2’ हा उपग्रह इस्रोच्या ‘लॉन्च व्हेईकल मार्क–3’ (LVM3) रॉकेटद्वारे आज (२४ डिसेंबर) यशस्वीपणे अवकाशात सोडण्यात आला.

या प्रक्षेपणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, हा इस्रोद्वारे आतापर्यंत प्रक्षेपित झालेला सर्वात जड उपग्रह ठरला आहे. तब्बल ६.१ टन वजनाचा हा पेलोड इस्रोच्या वाढत्या क्षमतेचा व भारताच्या अंतराळ शक्तीचा भक्कम पुरावा ठरला आहे.

‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक–2’ हा उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) स्थापन करण्यात आला असून, त्याच्या साहाय्याने थेट स्मार्टफोनवरून ४जी आणि ५जी सेल्युलर सेवा पुरविण्याचा उद्देश आहे. तो थेट स्मार्टफोनवर 4G आणि 5G सेल्युलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. याचा अर्थ असा की, वापरकर्त्यांना कोणत्याही विशेष हार्डवेअर किंवा डिशची आवश्यकता न भासता, थेट त्यांच्या नेहमीच्या स्मार्टफोनवर कॉल करणे, इंटरनेट वापरणे आणि व्हिडिओ सेवा मिळवणे शक्य होईल. 

हे यशस्वी प्रक्षेपण भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि यामुळे भविष्यातील दळणवळणाच्या पद्धतीत मोठे बदल अपेक्षित असून कोणत्याही विशेष साधनांशिवाय वापरकर्त्यांना थेट कॉलिंग, इंटरनेट आणि व्हिडिओ सेवेचा लाभ घेता येईल.

या प्रक्षेपणासह भारताने जागतिक व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात आपले स्थान अधिक बळकट केले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी साधलेल्या या यशामुळे भारताचे अंतराळ स्वप्न आणखी उंच भरारी घेण्यास सज्ज झाले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??