आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवनमध्ये आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

संजीवनमध्ये आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत आंतरविभागीय (इंटरझोनल) फुटबॉल स्पर्धा बुधवार ता. ३१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सदरच्या स्पर्धा संजीवनच्या टर्फ मैदानावर होणार असून सदर स्पर्धेसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि नागपूर या सर्व विभागातील पुरुष संघ सहभागी होणार आहेत. 

या स्पर्धेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे या विद्यापीठाचा संघ निवडण्यात येणार असून पुढील स्पर्धा ता. ५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत पारुल विद्यापीठ, गुजरात येथे होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत इंगवले यांच्या मार्गदर्शखाली क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व विद्यार्थी यांनी केले आहे. सदर स्पर्धेस संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजीव जैन आणि संजीवन स्कूलचे क्रीडा संचालक सौरभ भोसले उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??