आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

शिरोळ येथील दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाध्यक्षपदी कवी विठ्ठल वाघ: १ फेब्रुवारीला होणार साहित्याचा जागर

शिरोळ येथील दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाध्यक्षपदी कवी विठ्ठल वाघ : १ फेब्रुवारीला होणार साहित्याचा जागर

शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

 

शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलन रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी होत असून संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ख्यातनाम कवी विठ्ठल वाघ यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात ज्येष्ठ लेखिका, कवयित्री नीलम माणगावे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार, उपाध्यक्ष डॉ. दगडू माने व सचिव शंतनु यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनात पुणे येथील ख्यातनाम कथाकार प्रतिमा इंगोले यांचे कथाकथन होणार असून प्रसिद्ध गायक व सिने अभिनेते रावसाहेब भोसले हे कथाकथनाचे अध्यक्ष आहेत. तर निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून दंगलकार कवी नितीन चंदनशिवे हे उपस्थित राहणार असून स्थानिकांच्या कवी कट्ट्याचे अध्यक्षस्थान संजय सुतार हे भूषविणार आहेत.

दंगलकार नितीन चंदनशिवे

गेल्या अनेक वर्षांपासून नामवंत साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली होणारे शिरोळ येथील हे साहित्य संमेलन तमाम साहित्यप्रेमी रसिकांच्या मनावर भुरळ पाडत आहे.

साहित्य रसिकांनी साहित्याचा जागर करण्यासाठी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??