आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संजीवनचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न 

शंभूराजांच्या शौर्याचा आदर्श संजीवनच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा : सुदर्शन शिंदे.

संजीवनचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न 

 

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शंभूराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा आदर्श संजीवनच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि मोबाईलच्या स्टेटस मध्ये अडकण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा आपल्या कार्याने आदर्श बनवावी, असा पराक्रमी विचार संजीवन शिक्षण समूहाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलताना समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी व्यक्त केले.

सोहळ्याचा शुभारंभ मान्यवरांचे शुभहस्ते सरस्वती पूजन दीपप्रज्वलन आणि स्वागत गीताने झाला.प्रास्ताविक संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर.भोसले यांनी केले आपल्या प्रास्ताविकात भोसले म्हणाले वार्षिक पारितोषिक वितरण म्हणजे ज्ञान मंदिराचा आरसा असतो आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थी म्हणजे ज्ञान संस्कारांचा वारसा असतो. आजच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये संजीवनच्या 26 ज्ञानर्थींनी राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त केले आणि सर्व ज्ञान शाखांचे मिळून 126 पुरस्कार आज वितरित केले जाणार आहेत हा संजीवन ज्ञान मंदिरासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण आहे. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात किती उत्तुंग यश प्राप्त केले तरी त्यांनी माणूस म्हणून जगावे असा संदेश भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये दिला.

या पारितोषिक वितरणाचे निवेदन राकेश कांबळे, विद्या साळोखे, विजय यादव, धनंजय पाटील, रूपाली पाटील, आणि एस. आर. जमादार यांनी केले.

 पारितोषिक वितरण प्रमुख वक्ते सुदर्शन शिंदे, संजीवन शिक्षण संस्थेचे चेअरमन पी.आर.भोसले, सहसचिव एन.आर.भोसले, कार्यकारी संचालक सौरभ भोसले, सर्व विभागाचे प्राचार्य मुख्याध्यापक के. के. पोवार, शिल्पा पाटील- सांगावकर, महेश पाटील, बी. आर. बेलेकर, आणि पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले.

 याप्रसंगी संजीवन विद्यालय स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यमाचे इंग्रजी विषय शिक्षक धनंजय पाटील यांनी सातारा येथे संपन्न झालेल्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये शिवबा तू होतास म्हणून ही कविता सादर केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संजीवन च्या क्रीडापटूंनी देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्धल सर्व खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला.

यानंतर सोहळ्याचे प्रमुख वक्ते सुदर्शन शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि आजचा युवक या विषयावर आपल्या अमोघ वक्तृत्वाने सर्व विद्यार्थ्यांनाआणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शंभुराजांची विद्वत्ता शौर्य, धैर्य, 16 भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व, चार ग्रंथसंपदेची निर्मिती, आपले पिताश्री युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा जपण्याची शंभूराजांची वीरश्री, चातुर्याचा गनिमी कावा, आणि शंभूराजांचे बलिदान हे प्रसंग शिंदे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने जिवंत उभे केले. शंभूराजांच्या बलिदानाप्रसंगी सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि आभार महेंद्र कुलकर्णी आणि पांडुरंग गांजवे यांनी केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??