रत्नागिरी येथे २२ मार्चला रंगणार कोकण विभागीय गझल संमेलन

रत्नागिरी येथे २२ मार्चला रंगणार कोकण विभागीय गझल संमेलन:
रत्नागिरी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गझल मंथन साहित्य संस्था आयोजित कोकण विभागीय गझल संमेलन रत्नागिरीत २२ मार्च रोजी रंगणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ गझलकार डाॅ. कैलास गायकवाड भूषविणार आहेत. तर संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकारा राधा भावे यांच्या हस्ते होणार आहे. नामांकित गझलकारा पूर्णिमा पवार या स्वागताध्यक्षा आहेत.

अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार डाॅ. कैलास गायकवाड

उद्घाटक ज्येष्ठ गझलकारा राधा भावे
या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून केदार पाटणकर, बा. ह. मगदूम व डॉ. मनोज वराडे उपस्थित राहतील. या संमेलनात गझलयात्री-७ या प्रातिनिधीक गझलसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मुग्धा कुळये करतील.
संमेलनात दिवसभर विविध गझल मुशायरे रंगतील. या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद डॉ. कैलास गायकवाड, रवींद्र यशवंतराव, मानसी जोशी, सुनेत्रा जोशी भूषवतील. तर सूत्रसंचालन ज्योती शिंदे, सचिन इमानदार, अर्चना देवधर, विशाखा पाटोळे करतील.
हे संमेलन माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृह, साळवी स्टॉप रत्नागिरी येथे दिनांक २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. गझल संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझलमंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, संयोजक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, संमेलन समिती प्रमुख मुकुंदराव जाधव, संमेलन समन्वयक प्रदीप तळेकर, मुशायरा आयोजन समितीचे अध्यक्ष काशिनाथ गवळी, कोकण विभाग उपप्रमुख संजय कुळये, सहसचिव सुनेत्रा जोशी तसेच रत्नागिरी जिल्हा व कोकण विभागीय कार्यकारिणी केले आहे.



