ताज्या घडामोडी

पन्हाळ्यात नरवीर शिवा काशीद यांना अभिवादन महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे कार्यक्रम.

शिवा काशिद , बाजीप्रभू देशपांडे , जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात पन्हाळगड दुमदुमलाशिवाजीचा जयघोषात पन्हाळगड दुमदुमला

पन्हाळ्यात नरवीर शिवा काशीद यांना अभिवादन महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे कार्यक्रम.

शिवा काशिद , बाजीप्रभू देशपांडे , जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात पन्हाळगड दुमदुमला

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

नरवीर शिवा काशिद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथी निमित्त पन्हाळगडाच्या पायथ्याशी त्यांच्या समाधी स्थळ व पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमीची झालेली अलोट गर्दी . नरवीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘जय भवानी जय शिवाजी’ चा जयघोष व प्रत्येकाच्या डोक्यावर परिधान करण्यात आलेली भगवी टोपी यामुळे पन्हाळ्यावर अक्षरशः भगवे वादळ धडकल्याची प्रचिती आली. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या ३६६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.

सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीस्थळी अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर पन्हाळगडावर शिवाकाशीद त्यांच्या पुतळ्याला जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षक सभापती शितल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार, जिल्हाध्यक्ष मारुती टिपूगडे, मेघाराणी जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर टिपूगडे, सुनिता इंगळे, गजानन शिंदे, संजय रोकडे, रवींद्र काशीद, शिवा काशिद यांचे वंशज आनंदा काशीद, भीमराव काशीद, प्रवीण काशीद, गजानन काशीद, संतोष काशीद, नगराध्यक्ष जयश्री पोवार, उपनगराध्यक्ष सतीश भोसले यांच्यासह मान्यवर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर समाधीस्थळी आलेल्या मारण्यात आलेल्या बोरवेल चे व सौर उर्जेवर साकारण्यात आलेले विद्युत रोषणाईचे देखील उद्घाटन शितल यादव व रणवीरसिंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान करवीर पन्हाळ्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी देखील समाधीस्थळी भेट देत शिवा काशीद यांना अभिवादन केले. यानंतर पन्हाळा येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहात शिवा काशिद यांच्या जीवनावर प्रसिद्ध इतिहासकार गौरव जाधव यांचे व्याख्यान संपन्न झाले. शिवा काशिद यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पन्हाळा येथील मयूरबन उद्यान येथे महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

नरवीर शिवा काशीद यांचे कार्य न विसरण्यासारखे आहे. स्वामीनिष्ठा काय असती याचे ज्वलंत उदाहरण संपूर्ण जगाला शिवा काशीद यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवा काशीद यांचे नाव मराठीशाहीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे. तरी शिवा काशीद समाधी स्थळ व पुतळा उभा केलेल्या ठिकाणी विकासासाठी सदैव तयार असल्याचे आश्वासन जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी दिले. यावेळी पन्हाळ्यातील वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुतळा उभारणीत आजोबा, तर अभिषेक नातवाकडून

:पन्हाळागडावर नरवीर शिवा काशिद यांचा पुतळा सन २००१ साली उभा करण्यात आला. यावेळी खासदार स्व.उदयसिंगराव गायकवाड यांनी या पुतळा उभारणीसाठी आलेल्या अडचणी दूर करत यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने गायकवाड यांच्या प्रयत्नाने पन्हाळगडावर हा साजेसा पुतळा उभा झाला. आज पुण्यतिथीनिमित्त नाभिक महामंडळाच्या वतीने पुतळ्याला उदयसिंह गायकवाड यांचे नातू रणवीरसिंग गायकवाड यांच्या हाताने अभिषेक घालण्याचा योग आला. त्यामुळे पुतळा उभारणीत आजोबा तर अभिषेक नातवाकडून घालण्यात आल्याची समाधानकारक चर्चा गडावर रंगली होती.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??