आपला जिल्हाताज्या घडामोडी

विद्यार्थी दशेत सुदृढ आरोग्यासाठी काळजी घेण्याची गरज : सौ सारिका माने

विद्यार्थी दशेत सुदृढ आरोग्यासाठी काळजी घेण्याची गरज : सौ सारिका माने

कन्या विद्या मंदिर नं.२ मध्ये आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

विद्यार्थी दशेत असणारे सुदृढ आरोग्य हा भविष्याच्या जीवनाचा पाया असतो. त्यामुळे या काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असे मत सौ सारिका अरविंद माने यांनी व्यक्त केले. 

येथील कन्या विद्या मंदिर नं.२ मध्ये डॉ अरविंद माने युवा शक्ती, मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिक आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी सौ सारिका माने या बोलत होत्या. 

 

मातोश्री चिल्ड्रन्स क्लिनिकचे संचालक व प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित सर्व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचारासंदर्भात माहिती दिली. 

यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्रा के. एम. भोसले, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुजाता पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक धनाजी आवळे यांनी स्वागत व प्रस्ताविक आणि

रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव अमित जाधव, सदस्य चंद्रकांत भाट, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संदीप माने, राजू काळे, सौ. मनीषा कुंभार,यांच्यासह सर्व सदस्य मुख्याध्यापक घोळवे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??