कृषी व व्यापारताज्या घडामोडी

सभासद हिताच्या लाभदायक योजना सुरू करणार : रणजितसिंह माने – पाटील

सभासद हिताच्या लाभदायक योजना सुरू करणार : रणजितसिंह माने – पाटील




शिरोळ येथे दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा संस्था, बाळासाहेब माने विकास संस्थेची वार्षिक सभा उत्साहात : सर्व विषयांना मंजुरी

 



शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन कै दिलीपदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. संस्थेचे मालक असणाऱ्या सभासदांच्या सहकार्यामुळे संस्था प्रगतीपथावर कार्यरत आहेत. आगामी काळात या संस्थांच्या सभासदांसाठी माफक दरामध्ये स्व.दिलीपदादा पाटील सभासद आरोग्य योजना लवकरच सुरू करण्यात येणार असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते रणजितसिंह माने -पाटील यांनी केली.
येथील दिलीपदादा पाटील दिनदौलत विकास सेवा सोसायटी संस्थेची ५४ वी तर बाळासाहेब माने विकास सेवा सोसायटी संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली.
दिलीपदादा पाटील दिनदौलत संस्थेचे अहवाल वाचन सचिव पोपट काळे यांनी करून सभासदांना ११ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. यावेळी बाळासाहेब माने सोसायटी संस्थेचे अहवाल वाचन सचिव दिलीप गावडे यांनी करून संस्थेच्या खडतर प्रवासात साथ दिल्याबद्दल सभासदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी चेअरमन आप्पासाहेब काळे , सुभाष जाधव, डॉ दगडू माने आदींनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे सभासद डॉ दगडू माने यांचा सत्कार करण्यात आला.
भाषणात युवा नेते रणजितसिंह माने पाटील म्हणाले, स्व.दिलीपदादा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सभासदांनी दिनदौलत सोसायटी आणि बाळासाहेब माने सेवा सोसायटीच्या भरभराटीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सभासद हेच या संस्थांचे खरे मालक आहेत आणि विश्वस्त म्हणून आमच्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेली साथ खूप मोलाचे आहे. यापुढेही असेच सहकार्य व भक्कम साथ मिळावी.
या सभेस रामदास गावडे, विजयसिंह माने -देशमुख, ,गजानन चव्हाण, बजरंग काळे गुरुजी , बाबुराव देशमुख, मानसिंग पाटील, सुनील पाटील, फत्तेसिंह मोरे ,बाबुराव देशमुख, श्रीपाद पडळकर ,जयवंत माळी, बजरंग माने, तानाजी पाटील ,कृष्णा पुजारी ,बजरंग काळे, संभाजीराव जगदाळे, नारायण चुडमुंगे ,भिमराव इंगळे, शिवाजी आंबी, बाळासो पाटील, हंबीर पाटील ,आनंदा भातमारे, विलास गावडे ,संदीप आंबी ,दिलीप गाडगीळ यांच्यासह संस्थांचे संचालक, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??