आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

केंब्रिज स्कूल मध्ये प्रज्ञाशोध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 

 केंब्रिज स्कूल मध्ये प्रज्ञाशोध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 

मिरज:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल आयोजित प्रज्ञा शोध स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान, बुद्धिमत्ता, कलागुणांन आणि विचारशक्तीची कसोटी लागली. शाळेच्या वतीने ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.

स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये मेहंदी, केशरचना, नेल आर्ट, सॅलेड आणि फळांची रचना तसेच कोरीव काम, पॉट डेकोरेशन व किल्ला बांधणीत सिंधुदुर्ग, पन्हाळा, रायगड, प्रतापगड या किल्ल्याच्या प्रतिकृती मुलांनी उभारल्या. अशा निरनिराळ्या स्पर्धा मध्ये आपली प्रज्ञा आजमावली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, विचारसरणीला व कलागुणांना ही स्पर्धा चालना देणारी ठरली.

विद्यार्थ्यांना अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी व साहेबलाल शरीकमसलत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. “अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांनी अभ्यासाकडे केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञानासाठी व आपल्यातील सुप्त कला गुणांकडे पाहावे,” असे त्यांनी सांगितले. परीक्षक म्हणून अर्चना गौतम जैन, मयुरी गौरव कुल्लोळी, गोपाल कबनूरकर व प्रशांत भंडारे यांनी मार्गदर्शन केले.

संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील व कॅम्पस कोऑडीनेटर डॉ. सतिश पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहनातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

 प्रज्ञाशोध स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची नवी ऊर्जा आणि उत्साह जागवला गेला. अशा प्रज्ञा शोध स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??