देशी झाडांच्या संवर्धनाची शपथ घेऊन संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा येथे रक्षाबंधन सोहळा.

देशी झाडांच्या संवर्धनाची शपथ घेऊन संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा येथे रक्षाबंधन सोहळा.
पन्हाळा:वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क
आपल्या भारतीय संस्कृतीमधील सण आणि उत्सव केवळ माणसाच्या मनोरंजनासाठी नसून सर्वच जीवमात्राच्या उत्कर्षासाठी निर्माण झाले आहेत. आपल्यां सण आणि उत्सवा मागील हीच शुद्ध भावना पर्यावरण प्रेम आणि विज्ञाननिष्ठा आपल्या विद्यार्थ्यांना समजून देणे काळाची गरज आहे. याच विचारातून
पन्हाळा येथील संजीवन पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी आजचा रक्षाबंधन हा सण समाजाला धार्मिक आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत अभिनव पद्धतीने साजरा केला.
आजच्या रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या पवित्र सणाचे औचित्य साधून संजीवन मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शाळेतील व परिसरातील सर्व कदंब, आंबा, सोनचाफा ,जांभूळ नारळ चिंच पेरू अशा देशी पद्धतीच्या झाडांना राख्या बांधल्या.
आपल्या सणाच्या मागील पर्यावरण रक्षणाचा पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेऊन देशी झाडांच्या रक्षणाची व संवर्धनाची शपथ घेऊन रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी संजीवन संकुलातील मुलींनी सर्व मुलाना राख्या बांधून मिठाई भरवली आणि शिक्षकांना सुरक्षारक्षकांना आणि मुख्याध्यापकाना भारतीय परंपरेप्रमाणे आशीर्वाद घेऊन राख्या बांधल्या.
याप्रसंगी मुख्याध्यापक बेलेकर यांनी मुलाना रक्षाबंधन सणाचे महत्व सांगताना आपल्या भारतीय सण आणि परंपरा यांच्या मधील विज्ञानिष्ठा आणि पर्यावरण जागृती बद्दलची पूर्वजांची तळमळ समजून घेऊन आपण सर्वांनी पर्यावरणाचे भान ठेऊन आपले सण साजरे करायला हवेत असा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी समन्वयक अमोल राऊत, पांडुरंग गांजवे,विद्या साळोखे, वैशाली सोरटे, सुलोचना पाटील ,शीतल शिंदे, अमृता माने , यांच्यासह सर्व शिक्षकांचे विशेष योगदान लाभले.