ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

डॉ. रोहन चौधरी यांच्या निलंबन आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने दिली स्थगिती , प्रशासनाला मोठा धक्का शिक्षक संघटनेचा विद्यापीठ प्रशासनावर सूडबुद्धीचा आरोप, कुलगुरूंच्या निर्णयावर आक्षेप

डॉ. रोहन चौधरी यांच्या निलंबन आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाने दिली स्थगिती , प्रशासनाला मोठा धक्का

शिक्षक संघटनेचा विद्यापीठ प्रशासनावर सूडबुद्धीचा आरोप, कुलगुरूंच्या निर्णयावर आक्षेप


नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी हे मुळचे कोल्हापूरचे असून ते मार्च २०२४ पासून जेएनयू येथे समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्त आहेत.
यांच्या सेवासमाप्तीच्या निर्णयावर दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा हस्तक्षेप केला आहे.
विद्यापीठ प्रशासनाने गेल्या महिन्यात डॉ. चौधरी यांना अचानक बडतर्फ केले होते. या कारवाईवरील कायदेशीर प्रक्रियेत आता न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर कडक प्रश्न उभे केले आहेत.

*न्यायालयाचा थेट हस्तक्षेप*
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या कायदेशीर वैधतेवर कठोर आक्षेप घेतले. न्यायालयाने स्पष्ट केले की नोकरी संपवण्यासारखा गंभीर निर्णय घेण्यासाठी योग्य प्रक्रिया पाळली गेली का, याबाबत गंभीर शंका उपस्थित होतात. परिणामी, जेएनयू प्रशासनाला आपली भूमिका मवाळ करावी लागली.

*डॉ. चौधरी यांना दिलासा*
सध्या न्यायालयाने डॉ. चौधरी यांच्या निलंबन आदेशाला स्थगिती दिली असून, प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत ते विद्यापीठात आपली नियमित सेवा सुरू ठेवणार आहेत. त्याचबरोबर, त्यांना विद्यापीठाच्या अंतर्गत न्यायव्यवस्थेत अपील करण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. यामुळे त्यांची नियुक्ती पुढील काळासाठी सुरक्षित राहणार आहे.

*शिक्षक संघटनेची प्रतिक्रिया*
जेएनयू शिक्षक संघटना (JNUTA) यांनी न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत केले असून, या प्रकरणात त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. संघटनेने म्हटले आहे की प्रशासनाने “वैयक्तिक सूडबुद्धी आणि अन्यायकारक हेतू” ठेवून कारवाई केली होती. त्यांचा आरोप आहे की कुलगुरूंच्या गैरवर्तनामुळे एका तरुण प्राध्यापकाची कारकीर्द धोक्यात आली होती, मात्र न्यायालयीन हस्तक्षेपामुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

*प्रशासनावर टीका*
संघटनेच्या निवेदनानुसार, कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांच्याकडून घेतलेल्या निर्णयांमध्ये निष्पक्षतेचा अभाव दिसतो. शिक्षकांच्या मते, न्यायालयाचा मिळालेला हा निकाल प्रशासनासाठी एक स्पष्ट धक्का आहे आणि भविष्यात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विद्यापीठाला अधिक पारदर्शक प्रक्रिया अवलंबावी लागेल.
प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून योग्य न्याय मिळाल्याचे समाधान कोल्हापुरातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??