अंबाबाईची महाविद्या श्रीबगला माता रूपातील सालंकृत पूजा

नवरात्र विशेष
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
आज दि. २२ सप्टेंबर २०२५
अंबाबाईची महाविद्या श्रीबगला माता रूपातील सालंकृत पूजा
|| श्रीमाता ||
अश्विन शु. द्वितीया, मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५
पूजा क्रमांक २ / महाविद्या क्र.८
|| महाविद्या श्रीबगला माता ||
ध्यान मंत्र : मध्ये सुधाब्धिमणिमंडप-रत्नवेदी, सिंहासनोपरिगतांपरिपीतवर्णाम् |
पीतांबराभरणमाल्य – विभूषितांगीं देवीं नमामि धृतमुद्ग –वैरिजिव्हाम् ||
स्वरूप :
अमृत समुद्रामधील, मणिमंडपाच्या, रत्नखचित वेदिवरील, सिंहासनावर बसलेली पीतवर्णाची, पिवळी वस्त्रे व अलंकार धारण केलेली, एकहाती शत्रूची जीभ व एकहाती गदा धारण केलेल्या देवीला मी नमन करतो.
इतिहास :
एकदा सत्ययुगात सकल ब्रह्मांडात मोठे वादळ, उत्पात माजले, तेव्हा हे अरिष्ट थांबण्यासाठी भगवान् विष्णूंनी, सौराष्ट्रातील हरिततीर्थाकाठी श्रीदेवीची उपासना केली असता, श्रीविष्णूंच्या तपतेजापासून चैत्रशुद्ध अष्टमीस हिचा उद्भव झाला. ही आठवी महाविद्या असून, मृत्युंजय हा हिचा सदाशिव आहे. ही श्रीकुलातील देवता, दाक्षिणाम्नायपीठस्था आहे.
उपासना भेद :
बडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहद्भानु इ. नावांनी ही देवी ओळखली व उपासली जाते. हिची द्विभुज व चतुर्भुज रुपात उपासना होते.
फल :
हिच्या उपासनेने शत्रूच्या वाईट कृत्याचे, अतिवृष्टी, दुष्काळ, वातचक्र इ. सर्व गोष्टींचे, स्तंभन होते. ही उत्पात- कृत्ये त्वरित थांबतात, वशीकरण, रोगशांती, चमत्कारिक सिद्धींचा लाभ होतो


