शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्य दिनी शेतकरीच शेतात फडकवणार तिरंगा* आकुर्डे भुदरगड येथे दौलत शिंदे यांच्या शेतात*

शक्तीपीठ विरोधात स्वातंत्र्य दिनी शेतकरीच शेतात फडकवणार तिरंगा*
आकुर्डे भुदरगड येथे दौलत शिंदे यांच्या शेतात*
गारगोटी : एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क :
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी *तिरंगा झळकवू शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात* या टॅगलाईनखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शेतात तिरंगा फडकवत अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. *काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील* यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे.
*१) सकाळी ९ वाजता आकुर्डे (ता. गारगोटी) येथील दौलत शिंदे यांच्या शेतात*
*२) सकाळी १० वाजता एकोंडी (ता. कागल) लोंढे वसाहत येथील शिवाजी मगदूम यांच्या शेतात*
*३) सकाळी ११ वाजता कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील सुशीला गोपाळ पाटील यांच्या शेतात*
हे अभिनव आंदोलन करण्यात येईल. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, उद्धवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, सम्राट मोरे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, आर के मोरे, शिवाजी मगदूम, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, सत्यजीत जाधव, शामराव देसाई, सचिन घोरपडे, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासो चौगले, बयाजी शेळके, बिद्रीचे संचालक एस. आर. कांबळे, सुयोग वाडकर आदी सहभागी होणार आहेत.