शाहू कुमार भवन बहुद्देशीय प्रशाला येथे किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यानाचे आयोजन
गारगोटी:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्या सौजन्याने श्रीगणेशा आरोग्याचा शिबिरांतर्गत हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशाला गारगोटी येथे आरोग्यविषयक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी
किशोरवयीन मुलींच्या समस्या व लैंगिक शिक्षण
याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. युवापिढी शारीरिक मानसिक दृष्टया सशक्त होण्याच्या दृष्टीनेही ह्या उपक्रमाचा फायदा समाजाला होणार आहे.
या व्याख्यानासाठी ७० किशोरवयीन मुली व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक शिंदे यांचे सहकार्य लाभले.आभार शिक्षिका यादव व शिंदे यांनी मानले.