गणपतराव पाटील यांच्या हस्ते नांदणीतील खेळाडू, विद्यार्थ्यांचा सत्कार
शिरोळ- एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
नांदणी नगरीच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून येथील गुणवंत खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकविणाऱ्या सह्याद्री क्रीडा संघाचे नामवंत आणि कीर्तीवंत खेळाडू तसेच मार्गदर्शक आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यामध्ये मार्गदर्शक शितल पाटील, खेळाडू श्रेया राजगोंडा पाटील, नीलम संजय चौगुले, साक्षी विजय आंबी, प्राजक्ता सुरेश माने, सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण झालेली प्रतीक्षा दामटे, प्राजक्ता दामटे यांचा सत्कार झाला. सर्वच यशस्वितांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही गणपतराव पाटील यांनी दिली.
यावेळी संजय गुरव, शरद गोधडे व संजय सुतार यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नांदणी बँकेचे संचालक महेश परीट, ग्रामपंचायत सदस्य शितल उपाध्ये, किरण वठारे, संजय मगदूम, संजय सुतार, पिंटू कोळी, संभाजी दामटे, बाबासाहेब मोगलाडे यांच्यासह पालक, मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??