ताज्या घडामोडी

व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : चंद्रकांत भाट

व्यक्तीच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची : चंद्रकांत भाट

राजाराम विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा


शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
भारतीय संस्कृतीत शिक्षकाला म्हणजेच गुरूला मानाचे स्थान आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीत गुरु म्हणजेच शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक हा केवळ मार्गदर्शक नसतो तो जीवनाला दिशा दाखवणारा दिशादर्शक असतो. त्यामुळे भारतीय शिक्षण परंपरेत गुरु शिष्य असा संबंध अत्यंत पवित्र मानला जातो. शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. असे प्रतिपादन राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले.
येथील राजाराम विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार, अध्यापक सुनील घुमान्ना, रवींद्र वाघ, अध्यापिका सौ त्रिशला येळगुडे, सौ प्रतिभा साळोखे, सौ स्वाती जगदाळे यांचा शिक्षक दिनानिमित्त मानाचा कोल्हापुरी फेटा शाल श्रीफळ पुष्प आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सनी सुतार म्हणाले की डॉ.सर्वपल्ली. राधाकृष्णन यांनी शिक्षक म्हणून दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो.
शालेय व्यवस्थापन समितीने शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक कार्याला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी अध्यापक सुनील घुमान्ना, सौ त्रिशला येळगुडे, सौ प्रतिभा साळोखे, सौ स्वाती जगदाळे, यांनी मनोगत व्यक्त केले. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य पत्रकार बाळासाहेब कांबळे, नामदेव गंगधर, सुषमा सावंत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन सावंत यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??