आपला जिल्हाताज्या घडामोडी

दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीत लवकरच २५ हजार चात्याचा प्रकल्प कार्यान्वित : आ. अशोकराव माने सूतगिरणीची ३३ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा

दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सूतगिरणीत लवकरच २५ हजार चात्याचा प्रकल्प कार्यान्वित : आ. अशोकराव माने

सूतगिरणीची ३३ वी. वार्षिक सर्वसाधारण सभा

तमदलगे : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणीच्या उभारणीत व प्रगतीत संस्थेचे सभासद ,कामगार यांच्यासह नेतेमंडळी तसेच अनेक घटकांनी ताकद दिली आहे . त्यामुळे सहकार क्षेत्रात आदर्शवत सूतगिरणी म्हणून राज्यात नावलौकीक मिळवला आहे. केंद्र व राज्य सरकारने सूतगिरणीसाठी कायम सहकार्य केले असून या सूतगिरणीसाठी
शासनाकडून निधी प्राप्त झाला असून येत्या काळात २५ हजार चात्यांचा प्रकल्प सूतगिरणीत लवकरच कार्यान्वित होईल. असा विश्वास देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन व आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी व्यक्त केला.
श्री देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या तमदलगे येथील कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेच्या अध्यस्थानावरून संस्थेचे चेअरमन आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने हे बोलत होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सूतगिरणीचे कार्यलक्षी संचालक संजय बिडकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना हात उंचावून एकमताने मंजुरी दिली. संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला
बोलताना चेअरमन आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने पुढे म्हणाले की वस्त्रोद्योगास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सहकार क्षेत्रातील अडचणी पाहता सहकारी संस्था चालवणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीतही आपल्या सूतगिरणीने प्रगती साधत कामगार हित जोपासले आहे. शासनाने केलेल्या वेळोवेळी सहकार्यामुळे सूतगिरणीत अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यात आली आहे. लवकरच २५ हजार चात्याचा प्रकल्प कार्यान्वित होईल. राज्यातील नेते मंडळी व हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील जनतेने दाखवलेल्या पाठबळ आणि विश्वासाच्या जोरावर आमदारकीची संधी मिळाली आहे. या माध्यमातून लोकहिताची कामे करण्यात येतील. क्लस्टर योजनेतून निधी उपलब्ध करून सूतगिरणीच्या प्रगती बरोबरच अनेक उद्योगधंदे उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक अनिल कांबळे माणगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे, जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक सुभाषसिंग रजपूत, तातियाना माने, डॉ. दगडू माने, प्रा. आण्णासाहेब क्वाणे, यांनी आपल्या मनोगतामध्ये सहकार क्षेत्र अडचणीत असतानाही आमदार दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी स्वतःच्या कार्य कर्तृत्वावर विविध सहकारी संस्थांची प्रगती साधून हजारो बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या हातून असाच लोकाभिमुख कारभार होत असल्याने हातकणंगले तालुक्यातील जनतेने त्यांना आमदार करून जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगितले.
सूतगिरणीचे संचालक सौ. रेखादेवी माने, डॉ. अरविंद माने, सदाशिव उर्फ बबन बन्ने, वसंत देशमुख, चिंतामणी निर्मळे, विलास माने, बाबासाहेब मिसाळ, सुहास बोंद्रे, इंदुमती माने, अमरसिंह धुमाळ, नानासाहेब राजमाने, डॉ. अभिजीत माने, माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने, स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, माजी सरपंच शिवाजीराव माने देशमुख, संजय अनुसे, पिरगोंडा पाटील, भाजपा नेते अमरसिंह पाटील,माजी नगरसेवक दयानंद जाधव, सूतगिरणीचे चिफ अकाउंटंट विवेक कुलकर्णी, लेबर ऑफिसर सदाशिव संभगाव,सतीश राजमाने, यांच्यासह सूतगिरणीच्या सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर जी.आर. माने यांनी केले. व्हाईस चेअरमन जितेंद्र चोकाककर यांनी आभार मानले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??