आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवन पब्लिक स्कूलचा हॉकी संघ झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी रवाना.

संजीवन पब्लिक स्कूलचा हॉकी संघ झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी रवाना :

पन्हाळा: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

भारतीय शालेय खेळ महासंघ (स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया) यांच्या वतीने दिनांक 27 ते 31 जानेवारी रोजी रांची झारखंड येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील मुलांच्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी पन्हाळा येथील संजीवन पब्लिक स्कूल च्या हाॅकी संघाची निवड झाली आहे. या स्पर्धेत संजीवन पब्लिक स्कूल दिल्ली बोर्ड सीबीएसई चे प्रतिनिधीत्व करणार आहे.

संजीवनच्या राष्ट्रीय हाॅकी संघात केवल पटेल (कर्णधार),आयुष भंडारी,स्वराज जाधव, हर्षवर्धन गायकवाड,तनय बुचडे,विराज गावडे, आर्यंन पाटील, यशस्वी बेलेकर, आदेश फराटे,सोहम काशिद, शौर्य बर्गे, यशराज कोंडे,आर्यंन फराटे,आरूष कोंडे, रणवीर जाधव, यशवर्धन लायकर, अथर्व दळवी. या खेळाडूंचा समावेश आहे. 

या राष्ट्रीय संघास संस्थापक,चेअरमन पी.आर.भोसले, सहसचिव एन.आर.भोसले, क्रीडा संचालक सौरभ भोसले, प्राचार्य बी.आर.बेलेकर क्रीडा शिक्षक प्रकाश जाधोर यांचे प्रोत्साहन व हाॅकी प्रशिक्षक गणेश पोवार व नचिकेत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??