आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ व्यापारास सुरुवात : गुळाचा दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपये.

कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ व्यापारास सुरुवात : गुळाचा दर प्रतिक्विंटल ४,५०० रुपये.

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, दि. २२ : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या गूळ हंगामाची सुरुवात उत्साहात झाली. पारंपरिक महूर्त सौद्यांमध्ये गुळाला प्रति क्विंटल ४,५०० रुपयांचा दर मिळाला, ज्यामुळे बाजार परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे .हा सोहळा मधुकर पाटील यांच्या अडत दुकानातून पार पडला. उद्घाटन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले, तर बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त करताना शेतकरी, अडते, व माथाडी कामगार यांना एकत्र घेऊन गूळ व्यापारातील समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांनी यावेळी हंगामाच्या प्रारंभी मिळालेल्या दराचे स्वागत केले असले तरी, हा दर आगामी काही महिने कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी दरात घसरण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सौदे थांबवले होते . यंदा मात्र गुजरात बाजारपेठेत मागणी वाढल्याने दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे .कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ९०हून अधिक गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत. पावसाने उघडीप घेतल्याने ऊस पुरवठा सुरळीत सुरू असून, त्यामुळे गुळाची आवक वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा देशभरात उच्च प्रतीच्या गुळ उत्पादनासाठी ओळखला जातो. सध्या ‘एक नंबर’ गुळाला सर्वाधिक मागणी असून, काही ठिकाणी पाच हजार रुपयांचा भावही मिळत आहे .दरम्यान, गुळ उत्पादकांनी बाजार समितीकडे जीएसटी परत मिळण्यासाठी योग्य पावले उचलावीत, अशीही मागणी केली आहे. साखर दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गुळ दरात वधारलेली तेजी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे .पुढील पाच महिन्यांच्या गुळ व्यापार हंगामामुळे बाजारातील हालचालींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक गोड व्यापाराचा प्रारंभ झाल्याने कोल्हापूर बाजार समितीत सुगंधी गुळाचा गोडवा पसरला आहे .

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??