अंबाबाई दर्शनासाठी भाविक पर्यटकांसह, सहलींचा ओघ वाढला
सुट्ट्या अणि निवडणूका यामुळे कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल्ल

अंबाबाई दर्शनासाठी भाविक पर्यटकांसह, सहलींचा ओघ वाढला
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राज्यातील महानगरपालिका निवडणूकीमुळे धार्मिक सहलींची पर्वणी सुरू झाली आहे. मतदारांना दर्शन घडवून आणलं जातंय. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबर महिना आणि ख्रिसमस सुट्टीत भाविक पर्यटकांची संख्या पंचवीस टक्के वाढली आहे. अंबाबाई दर्शनासाठी दररोज लाखों भाविक पर्यटकांचे जथ्थे दाखल होत आहेत देवस्थान समितीने भाविकांसाठी सर्व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण गर्दी अधिक होत असल्याने यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे असे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले. विशेषतः महिला मतदारांसाठी आयोजित सहलींचे प्रमाण वाढले आहे. पुणे, धाराशिव, अहिल्या नगर, संभाजीनगर भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दररोज सरासरी पाऊण लाख ते दीडलाख भाविक दर्शनासाठी अंबाबाई मंदिरात दाखल होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अधिक गर्दी होत आहे. गर्दीच्या काळात चोरीची कोणतेही व अनुचित घटना घडली नाही. सुव्यवस्थित दर्शन व्यवस्था नियोजन योग्य करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांतील भाविकांची संख्या
दिनांक 19.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 74839 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक 20.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 85729 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक 21.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 1,12,212 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक 22.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 85021 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक 23.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 74984इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक 24.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 1,35,629 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले दिनांक 25.12.2025 रोजी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे 1,52,643 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले. एकंदरीतच सुट्ट्या अणि निवडणूका यामुळे कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून येत आहे.



