लखन बागडी खून प्रकरणातील चौघांना पोलीस कोठडी:
जयसिंगपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करताना उदगाव (ता.शिरोळ) येथे जॅकवेलजवळ लखन सुरेश घावट उर्फ बागडी (वय 35, रा.मच्छी मार्केट परिसर, जयसिंगपूर) याच्या डोके दगडाने ठेचून निघृण खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अक्षय राजू माने (वय 24), संकेत रामचंद्र हंबर (वय 37), अमीन केसरसिंग रजपूत (वय 25), अमित महादेव सांगावकर (वय 40, सर्व रा.जयसिंगपूर) यांना रविवारी रात्री अटक केली होती. सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खून प्रकरणात प्रथमेश उर्फ गोट्या हणमंत पवार व अरविंद माळी (दोघे रा.जयसिंगपूर) हे दोघे अद्याप फरार असून जयसिंगपूर पोलीस यांच्या शोधात आहेत.