ऊस दर – बैठक निष्फळ: आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
ऊस दर – बैठक निष्फळ: आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यातील बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने निष्फळ ठरली आहे.
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची महत्वाची बैठक पार पडली. मात्र, ऊस दरावर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी संघटनांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागणी केली आहे की, गेल्या हंगामातील थकीत फरक त्वरित दिला जावा, तसेच चालू हंगामात पहिली उचल म्हणून प्रतिटन 3,751 रुपये विनाकपात जाहीर करावी. ”ही मागणी पूर्ण होईपर्यंत कोणताही कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा शेट्टी यांनी दिला आहे.दुसरीकडे, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश कारखानदारांनी प्रतिटन 3,400 ते 3,450 रुपये दरम्यान पहिली उचल देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी हा दर साफ नाकारला असून पुढील रणनीतीसाठी सिद्धता दर्शवली आहे.आंदोलनाची पुढची दिशा अंतिम करताना शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना भूमिगत राहून संघटनेचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ”योग्य दर न मिळाल्यास कोणताही शेतकरी ऊस कारखान्यांना देणार नाही,” असे आवाहन केले. जर ७ नोव्हेंबरपूर्वी सरकारने निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ती निष्फळ ठरली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दरासाठीचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
					

