आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी
संजीवन विद्यालयाची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी आगेकूच

संजीवन विद्यालयाची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी आगेकूच
कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या विभागीय फुटबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा,कोल्हापूर मनपा ,सांगली जिल्हा, सांगली मनपा, इचलकरंजी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यातून संघ सहभागी झाले होते ही स्पर्धा गडहिंग्लज येथे आयोजित केली होती.
या स्पर्धेत पहिला उपांत्य सामना बलाढ्य कोल्हापूर मनपा महाराष्ट्र हायस्कूल व सांगली मनपा अल्फोंसो स्कूल यांच्यात होता सदरचा सामना पूर्ण वेळेत एक एक बरोबरीत सुटला याचा निकाल पेनल्टी स्ट्रोक वर लावण्यात आला या सामन्यात सांगली संघाने बलाढ्य महाराष्ट्र हायस्कूलचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.
दुसरा उपांत्य सामना कोल्हापूर जिल्हा संजीवन विद्यालय आणि सैनिक स्कूल सिंधुदुर्ग यांच्यात झाला सदरचा सामना संजीवन स्कूलने 6 विरुद्ध 0 गोल ने विजय मिळवला सदरच्या सामन्यात शुभंकर भाटे पार्थ खवरे प्रीत भोसले यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
अंतिम सामना संजीवन स्कूल व अल्फान्सो स्कूल यांच्यामध्ये झाला हा सामना संजीवन स्कूलने 4 विरुद्ध 0 गोलने एकतर्फी विजय मिळवून अमरावती येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यांमध्ये शुभंकर भाटे, पार्थ खवरे, श्रेयस कोरवी यांनी गोल केले.
विजयी संघामध्ये : शुभंकर भाटे कर्णधार , प्रीत भोसले सार्थक हावलदार, पार्थ खवरे, प्रद्युम पारठे, श्रेयस कोरवी, ओम कुराडे, केदार भोसले, वीर पाटील, पियुष गायकवाड, वेदांत माळी, सोहम माळी, जक्शन सिंग, विकास सिंग यांचा सहभाग होता.
संघाला संजीवनचे चेअरमन पी. आर.भोसले, सहसचिव एन. आर.भोसले, प्राचार्य महेश पाटील, क्रीडा संचालक सौरभ भोसले,क्रीडा शिक्षक सागर पाटील व जयंत कुलकर्णी तसेच तसेच फुटबॉल प्रशिक्षक अमित साळोखे, नितीन पाटील, संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले या विजयी संघाची अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.



