आपला जिल्हाताज्या घडामोडी

तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी रस्ता रुंदीकरणासह तीस फुटी केला जाणार अखेर 25 वर्षाच्या मागणीला संघटित प्रयत्नामुळे न्याय – दिगंबर सकट

तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी रस्ता रुंदीकरणासह तीस फुटी केला जाणार अखेर 25 वर्षाच्या मागणीला संघटित प्रयत्नामुळे न्याय – दिगंबर सकट

शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शिरोळ तहसील कचेरी ते दत्त कारखाना हा रस्ता दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यासह दुरुस्त व्हावा या मागणीसाठी समता नगर सह परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिरोळ नगरपालिका प्रशासन जागे झाले असून तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी पर्यंतचा रस्ता तीस फूट रुंदीकरणासह आचारसंहिते नंतर लवकरात लवकर करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिरोळ मुख्याधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती समता नगर जनहित मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर सकट यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची व रुंदीकरणाची नागरिकांची मागणी होती. हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून सामान्य नागरिकाला चालत जाणे ही मुश्किल झाले आहे .या कामी समता नगर जनहित मंडळांनी पुढाकार घेऊन समतानगर, साईनगर ,बेघर वसाहत, इंदिरानगर ,रमाबाई नगर या भागातील नागरिकांच्या निवेदनासह आंदोलन उभारण्याचा इशारा वेळोवेळी दिला होता व दिनांक 10 /11/ 25 रोजी शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाची नोटीस दिली.

   याबाबत नगरपालिका प्रशासनाने शिष्टमंडळातील दिगंबर सकट, अशोक कांबळे, दिनकर मोरे भाट, रियाज मोमीन टेलर ,सहदेव कांबळे,भाऊसो कदम गुरुजी, आनंद सकट, सचेतन बनसोडे ,सौरभ घाडगे ,जालंदर वराळे, सलाउद्दीन तहसीलदार, समीर मताबे आदींशी चर्चा करून या रस्त्याबाबतची सविस्तर माहिती दिली. हा रस्ता नगरपालिकेने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले व आचारसंहिता संपताच तहसीलदार कचेरी ते बेंद्रे दूध डेरी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर अतिक्रमण निर्मूलनासह तीस फूट रुंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

  हे आश्वासन पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिगंबर सकट यांनी या पत्रकात दिला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??