शाळांमधील मारहाण व मानसिक छळास पूर्णविराम: महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाची नवी कठोर नियमावली जाहीर

शाळांमधील मारहाण व मानसिक छळास पूर्णविराम: महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाची नवी कठोर नियमावली जाहीर
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी नवी आणि कठोर नियमावली जारी केली आहे. या नियमांनुसार, राज्यातील कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणारी कोणतीही शिक्षा देणे पूर्णतः बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. सर्व शाळांना आता अनिवार्यपणे सुरक्षा आराखड्याचे पालन करावे लागणार आहे.
वसईतील घटनेनंतर सरकारची ठोस कारवाई.
काही दिवसांपूर्वी वसई येथील एका शाळेत सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून तब्बल १०० उठाबशा काढायला लावण्यात आल्या. या अमानुष शिक्षेमुळे त्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची शासनाने गंभीर दखल घेत संबंधित शाळेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर ही नवी नियमावली लागू करण्यात आली आहे.
नवीन निर्देशांनुसार पुढील कृत्यांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे — ♦️विद्यार्थ्यांना मारहाण करणे.
♦️कानशिलात लगावणे.
♦️कान किंवा केस ओढणे.
♦️उठाबशा, गुडघे टेकवून बसवणे किंवा जमिनीवर बसायला लावणे.
♦️विद्यार्थ्यांना ढकलणे. जास्त वेळ उन्हात किंवा पावसात वर्गाबाहेर उभे करणे.
♦️शिक्षेच्या स्वरूपात अन्न किंवा पाणी जप्त करणे वारंवार तोंडी अपमान, धमक्या देणे.
डिजिटल व वैयक्तिक संवादावरही निर्बंध. 🔵विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेसाठी शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यांना — खासगी संदेश, चॅट किंवा सोशल मीडियाद्वारे वैयक्तिक संवाद साधण्यास मनाई पालक व संस्थेच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास बंदी
⭕️उल्लंघन केल्यास कठोर कारवाई :
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी किंवा शाळा व्यवस्थापनावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.



