ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये भारताच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाचा समावेश.

ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये भारताच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाचा समावेश.
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
दिग्दर्शक नीरज घायवान यांच्या होमबाउंड या चित्रपटाला ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी (ऑस्कर २०२६) बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीत १५ चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. भारतातर्फे अधिकृत म्हणून निवडलेला हा हिंदी चित्रपट आता अंतिम नामांकनासाठी स्पर्धेत आहे.

या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांचे प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातील दोन मित्रांच्या महत्वाकांक्षेच्या कथेचे हे मार्मिक चित्रण आहे. टोरॉंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यानंतर आता हॉलीवूडच्या थरारक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शॉर्टलिस्ट जाहीर झाल्यानंतर करण जोहर, ईशान खट्टर आणि इतर कलाकारांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. ८६ देशांतून आलेल्या १५ चित्रपटांमध्ये भारताच्या ‘होमबाउंड’चा समावेश होणे हे मोठे यश आहे.मात्र,मदर इंडिया’, ‘लगान’ सारख्या चित्रपटांनी यापूर्वी नामांकन मिळवले असले तरी भारताला अद्याप या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळालेला नाही. ‘होमबाउंड’ ते स्वप्न पूर्ण करेल का ? याची उत्सुकता सर्व भारतीयांना लागली आहे.
अंतिम नामांकने २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार असून, १५ मार्चला ऑस्कर सोहळा होईल. या चित्रपटाला ऑस्कर स्पर्धेत यश मिळाल्यास हा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो .



