आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरटी ग्रामपंचायतीचा “दारू नको ,दूध प्या” उपक्रम कौतुकास्पद : राजू शेट्टी

शिरटी ग्रामपंचायतीचा “दारू नको , दूध प्या” उपक्रम कौतुकास्पद : राजू शेट्टी

शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

व्यसन हे आयुष्याचे खूप मोठे नुकसान करते. या व्यसनातून अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहेत. यासाठी व्यसनाधीन युवकांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रबोधनाचे महत्व लक्षात घेऊन शिरटी ग्रामपंचायतीने दिनांक ३१ डिसेंबर रोजी राबवलेला “दारू नको , दूध प्या” हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे उद्गार, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत शिरटी, ता.शिरोळ येथे आयोजित केलेल्या “दारू नको, दूध प्या” या कार्यक्रमात बोलत होते.

       यावेळी, बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की शिरटी ग्रामपंचायत नेहमी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असते. जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थांसाठी विविध सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले आहे. राष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या गोरगरिबांची मुलांना जर चांगले शिक्षण द्यायचे असेल तर या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

           दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, जयसिंगपूरचे नगरसेवक बजरंग खामकर, शिरोळचे नगरसेवक उल्हास आवळे, सौ. सुवर्णा कांबळे, सौ. सविता पुजारी, अशोक चौगुले, विनोद मगदूम यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनचा आणि दारू नको दूध प्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी स्वागत करून व्यसनमुक्ती आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. संजय येदवाडे यांनी व्यसनमुक्ती आणि जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनचा कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारास उपस्थितीतांनी रोख रकमेची बक्षिस आणि टाळ्यांचा गजर करून दाद दिली. या कार्यक्रमानंतर दारू नको दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात

यावेळी सरपंच शुभांगी शिरगावे, उपसरपंच प्रकाश माळी, माजी सरपंच सौ अनिता चौगुले, सौ. हसीना मुल्लाणी, माजी उपसरपंच सागर पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. भारती माळी, राजकुमार शिरगावे, सतीश चौगुले, अलम मुल्लाणी, सुनील माळी, प्रकाश उदगांवे महेश हत्ती, संदीप रोजे, कुलदीप बनजवाडे, निखिल पाटील, शिवम लंबे, संदीप चौगुले यांच्यासह विद्यार्थी जि.प. शाळेचे शिक्षक व महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक बी.बी. पाचंगे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??