शिरोळच्या विकासात पत्रकारांचे योगदान उल्लेखनीय : प्रा. के. एम. भोसले. रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्यावतीने पत्रकारांचा सन्मान.

शिरोळच्या विकासात पत्रकारांचे योगदान उल्लेखनीय : प्रा. के. एम. भोसले. रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्यावतीने पत्रकारांचा सन्मान.
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पत्रकारितेतील सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक जबाबदारीची ही मशाल अशीच तेजस्वी राहण्यासाठी सर्वच पत्रकार बांधवांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे यामुळेच देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक भक्कमपणे कार्यरत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्यासाठी आणि प्रश्न विचारण्याचे धैर्य उराशी बाळगत अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सर्वसामान्यांचे दुःख मांडणे हीच खरी पत्रकारिता निस्वार्थपणे पत्रकारांनी जपली आहे. यामुळे शिरोळच्या विकासात शहरातील सर्वच पत्रकार बांधवांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. असे मत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे अध्यक्ष मेजर प्रा. के. एम. भोसले यांनी व्यक्त केले.
येथील हॉटेल अशोकामध्ये पत्रकार दिनानिमित्त मंगळवारी रात्री शिरोळ शहरातील सर्वच पत्रकारांचा सन्मान सोहळा रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्या वतीने उत्साहात संपन्न झाला. यावेळी मेजर प्रा. भोसले हे बोलत होते.
पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, सचिव डॉ. दगडू माने, सदस्य चंद्रकांत भाट, महेश पवार, संदीप बावचे, बाळासाहेब कांबळे, निनाद मिरजे, संदीप इंगळे, दिलीप उर्फ दिवाण कोळी, राजेंद्र कुंभार, मदन गावडे, अविनाश सूर्यवंशी, दत्तात्रय खडके, भूषण गंगावणे, आप्पालाल चिकोडे यांचा सत्कार करण्यात आला.
क्लबचे सदस्य ॲड. श्रीकांत माळकर यांनी स्वागत केले. आप्पालाल चिकोडे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. आर. पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी आपल्या मनोगतामध्ये क्लबचे सामाजिक कार्य आदर्शवत आहे. क्लबच्या लोकोपयोगी कार्यात शहरातील सर्वच पत्रकारांचा सहभाग असेल असे आश्वासित केले.
यावेळी क्लबचे खजिनदार विराजसिंह यादव, सदस्य राहुल यादव, शरद उर्फ बापू मोरे,तुकाराम पाटील, सुरेश देशमुख, प्रा. सुभाष पाटील, श्रीकांत जाधव, सचिन सावंत, अनिल महाजन, विक्रमसिंह भोसले, डॉ अतुल पाटील, संजय शिंदे, यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. क्लबचे सचिव अमित जाधव यांनी आभार मानले. चंद्रकांत भाट यांनी सूत्रसंचालन केले.



