आपला जिल्हाताज्या घडामोडी

पत्रकार चंद्रकांत भाट यांना ‘शिव प्रेरणा पुरस्कार’ जाहीर कोल्हापुरात गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळा

पत्रकार चंद्रकांत भाट यांना ‘शिव प्रेरणा पुरस्कार’ जाहीर कोल्हापुरात गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळा

​शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व परिवर्तन फौंडेशन प्रणीत ‘सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा ‘शिव प्रेरणा पुरस्कार’शिरोळचे पत्रकार चंद्रकांत भाट जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकार चंद्रकांत भाट यांच्यासह प्रशासन, समाजसेवा आणि कला क्षेत्रातील १४ मान्यवर व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे कार्यवाहक मच्छिंद्र रूईकर यांनी दिली.

​हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, कोल्हापूर येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे आयोजित ‘शिव महोत्सवा’त संपन्न होणार आहे.

​या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते होणार असून, पँथर आर्मीचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्रसिंग वालिया हे उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मीचे प्रमुख संतोष आठवले भूषविणार आहेत.

गेली वीस वर्ष पत्रकार चंद्रकांत भाट हे पत्रकारिता व सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक यासह विविध क्षेत्रात सक्रिय आहेत. रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य, राजाराम विद्यालय शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, विविध मंडळाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिवप्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

​या पुरस्कार सोहळ्यासाठी परिवर्तन फौंडेशनचे संस्थापक अमोल कुरणे, चंद्रकांत मुळे, उमेश जामसंडेकर, प्रा. अरुण मेढे, ज्योतीताई झरेकर, लक्ष्मीकांत कुबळे, बबन तांदळे, सौ. छाया सातारकर नितेश कुमार दिक्षांत जिल्हा महासचिव , संजय कांबळे जिल्हा उपाध्यक्ष , राजू मोमीन हातकणंगले तालुका अध्यक्ष आनंदा तरटे करविर तालुका उपाध्यक्ष, भिकु कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष यांच्यासह जिल्हयातील अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शिव महोत्सवास जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भाट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??