आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पन्हाळा सरकारी दवाखान्यात डॉक्टर मद्यधुंद. रुग्णसेवा रामभरोसे..

आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टर झाला मद्यधुंद…पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार…रुग्णसेवा रामभरोसे..

पन्हाळा/ विशेष प्रतिनिधी :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

डॉक्टर म्हणजे दुसरे देवाचे रुप,डॉक्टरांच्या प्रयत्नाच्यामुळेच अनेकजण मरणाचा तोंडातुन सुखरुप बाहेर पडले आहेत.पण एखाद्या चुकीमुळे काही दगा फटका देखील होण्याची शक्यता दाट असते. डाॅक्टरांच्या कडे आरोग्यसेवेची मोठी जबाबदारी.पण डाॅक्टराकडूनच जर ऑनड्युटी दारु पिण्याचा प्रकार घडत असेल तर रुग्णांनी काय करावे.असा प्रश्न साहजिकच उपस्थित राहिल.पण पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्याकडून आँनड्युटी दारु पिऊन मद्यधुंद होण्याचा प्रकार उघडकीस आल्याने गडावर एकच खळबळ उडाली आहे.त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकार झाल्याने यंत्रेणेवर कोणाचा धाकच राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान याबाबत पन्हाळावासियांच्यातुन संताप व्यक्त होत आहे.

पन्हाळा ग्रामीण रुग्णालायत आरोग्य सेवा कमी मात्र बाकीच्या भानगडी जास्त सुरु असल्याबाबत नागगिकांच्यात ओरड सुरु आहेच.त्यात येथे सुविधांचा अभाव असल्याने काही ज्यादा दुखलं-खुपलं की येथील डॉक्टर थेट सीपीआरला पाठविण्यासाठी चिठ्ठी देणे हे ठरल्यासारखे.तर काहीजणांकडून जबाबदारी नको म्हणून देखील अशा प्रकार केला जातो.त्यामुळे अगोरदरच चर्चेत हा सरकारी दवाखाना असताना शनिवारी रात्री येथे आरोग्य अधिकारी म्हणून नव्याने बदलुन आलेले दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.पन्हाळ्यातील एका व्यक्तीला फिट आली.त्यामुळे रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना पन्हाळ्यातील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.यावेळी डॉक्टर दिंगबर टोणपे यांना ऩा सरळ चालता येत होते,ना बोलता.तर हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी त्यांना त्यांचे नाव विचारले असता.त्यांनी चक्क आपल्या दारुच्या ब्रँडचेच नाव सांगितल्याची माहिती नागरिकांनी दिली.त्यामुळे येथे असणाऱ्या सिस्टरकडून रुग्णाला तपासण्यात आले.रुग्णाची तब्येत खालवत चालल्याने १०८ रुग्ण वाहिकेला बोलावून अखेर रुग्णाला कोल्हापुरात हलवण्यात आले. हा झालेल्या प्रकारामुळे पन्हाळ्यासह परिसरातील नागरिकांच्यात संतापाची लाट उसळली आहे.याठिकाणी कर्मचाऱ्यांकडून देखील रस्सा मंडळ, पार्टी होत असल्याची चर्चा असल्याने नेमका पन्हाळा ग्रामीण रुग्णालय म्हणजे पिकनीक पाँईटच बनला असल्याचे समोर आले आहे.दरम्यान एखादा गंभीर रुग्ण असता तर मात्र काय झाले असते.त्याला काय बरेवाईट झाले असते.तर सर्वस्वी आरोग्य विभागच जबाबदार राहिला असता.हेही तितकेच खरे आहे.तरी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे कोल्हापूर जिल्ह्यातचेच असल्याने त्यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार झाल्याने यावर आरोग्य मंत्र्यांच्यासह वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाईचा कडक डोस देण्याची मागणी होत आहे. दरम्यान ग्रामीण रुग्णालायतील आरोग्य अधिकाऱ्याचा दारुच्या नशेतील व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजला आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??