आपला जिल्हाताज्या घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे जागतिक आरोग्य दिन साजरा

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे जागतिक आरोग्य दिन साजरा

गारगोटी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे जागतिक आरोग्यदिन मोठया उत्साहात संपन्न झाला.गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांनी शारीरिक, मानसिक आरोग्य यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. निरोगी राहण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील सर्व सोयीसुविधांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच ग्रामीण जनतेला एकंदरीत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या ” माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ” या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी केले. मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, कॅन्सर, मानसिक आजार यासारख्या असंक्रमनजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जीवनशैलीबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यासाठी आयुर्वेद चिकित्सापद्धतीत सांगितलेला आहारविहार आणि त्याची सध्यस्थितीतील आवश्यकता व परिणामकारकता याची त्यांनी उपस्थितांना सोप्या भाषेत माहिती दिली.

दंतरोगचिकित्सक डॉ. वृषाली खोत यांनी शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आवश्यक जीवनपद्धती यावर मार्गदर्शन केले तसेच त्यांनी मौखिक आरोग्याविषयी उत्तम माहिती दिली. आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता शेट्टी यांनी मानसिक आरोग्य आणि सकारात्मक जीवनपद्धती याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या आयुष्यातील योग,ध्यानधारणा यांचे असलेले महत्व त्यांनी विशद केले तसेच आयुष विभागातर्फे आठवड्यातून दोन वेळा घेण्यात येत असलेल्या योगा व वेलनेस सेशनचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी महिलांमधील रक्तक्षय आणि त्यावरील उपाययोजना याविषयीची अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे नोंदवत महिलांना आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी महत्वाच्या टिप्स दिल्या. टी. बी. हारेगा देश जितेगा..असा नारा देत रुपाली पाटील यांनी टी. बी. आजाराची व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांची सविस्तर माहिती दिली. सध्या सुरु असलेल्या टी. बी. मुक्त भारत अभियान 100 दिवस मोहीम.. या अंतर्गत त्यांनी 14 वर्षावरील सर्व व्यक्तींची टी. बी. साठी तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले तसेच सर्व उपस्थितांना टी. बी. मुक्ततेची शपथ दिली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने रुग्णालयातील admit सर्व रुग्णांना दंतचिकित्सा विभागामार्फत oral hygine kit चे वाटपही करण्यात आले.डॉ. सविता शेट्टी यांनी आभार मानले.                                          एकदंरीतच निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच मुद्द्यांवर भाष्य करुन उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे जागतिक आरोग्यदिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचा सर्व स्टाफ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज पेडणेकर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??