आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्रसाद कुलकर्णी “निवृत्ती पाटील समाजकार्य व साहित्यसेवा पुरस्काराने सन्मानित”

प्रसाद कुलकर्णी ” निवृत्ती पाटील समाजकार्य व साहित्यसेवा पुरस्काराने सन्मानित “

इचलकरंजी:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांना म्हैसाळ ( ता.मिरज जि.सांगली)येथील महात्मा गांधी वाचनालय आणि कवी आबासाहेब पाटील परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ” निवृत्ती पाटील समाजकार्य व साहित्य विशेष सेवा पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे महसूल विभागाचे अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे आणि जीएसटी विभागाच्या अप्पर आयुक्त वैशाली पतंगे हे प्रमुख पाहुणे होते. ज्येष्ठ त्वचारोगतज्ञ व रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक यांना ” “निवृत्ती पाटील नाट्य सेवा विशेष सेवा पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे तुषार ठोंबरे म्हणाले”महात्मा फुले यांचे कर्तेपण ज्यांच्या कार्यात दिसते अशा‌ समाजसेवी व्यक्तीना पुरस्कार दिला‌ ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.तर वैशाली पतंगे म्हणाल्या,माणसांने समरस होऊन आयुष्य जगले पाहिजे.अस्सल चित्र पाहण्यासाठी वैयक्तिक वाटा धुंडाळता आल्या पाहिजेत.अशा‌ कृतिशील माणसांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे हे महत्त्वाचे आहे.

प्रसाद कुलकर्णी व डॉ. दयानंद नाईक यांनी आपल्या मनोगतातून या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी नव्याने पोलीस भरती झालेल्या तरुण-तरुणींचा शुभेच्छा सत्कार करण्यात आला. स्वागत मुबारक सौदागर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. भरतेश्वर पाटील यांनी केले.तर कविवर्य आबा पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी संत ज्ञानेश्वर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि ज्येष्ठ नेते आबासाहेब शिंदे यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आला. म्हैशाळच्या आबासाहेब शिंदे चौकामध्ये झालेल्या या कार्यक्रमास महेश कराडकर, अभिजीत पाटील, उमेश जगताप, आर.जे.पाटील, शुभांगी घोडके यांच्यासह वाचनलयाचे पदाधिकारी, पाटील कुटुंबीय , परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??