ताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय

फक्त ४ दिवसांत ११ मिलियन फॉलोअर्ससह ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर जागतिक विक्रम

एका मराठी मुलाच्या कल्पकतेने जगभरात घातला धुमाकूळ!

फक्त ४ दिवसांत ११ मिलियन फॉलोअर्ससह ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा सोशल मीडियावर जागतिक विक्रम

एका मराठी मुलाच्या कल्पकतेने जगभरात घातला धुमाकूळ!

​नवी दिल्ली:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

​भारतीय राजकारणाच्या इतिहासात कधीही न घडलेला आणि कोणाच्या कल्पनेच्याही पलीकडचा एक अभूतपूर्व चमत्कार अवघ्या चार दिवसांत देशाने पाहिला आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला (BJP) सोशल मीडियाच्या मैदानात एका काल्पनिक आणि उपरोधात्मक पक्षाने चारी मुंड्या चीत केले आहे. अवघ्या ९६ तासांमध्ये तब्बल ११ मिलियन म्हणजेच १ कोटी १० लाखांहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (KJP) इन्स्टाग्रामवर नवा इतिहास रचला आहे. भाजपच्या अधिकृत अकाऊंटला (८.७ मिलियन) कित्येक मैल मागे टाकत या चळवळीने मिळवलेले हे यश म्हणजे देशातील प्रस्थापित सत्तेविरुद्ध तरुणाईच्या मनात साचलेल्या संतापाचा विराट महास्फोट मानला जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण वादळाची निर्मिती आणि त्याचे नेतृत्व अभिजीत दिपके या एका मराठी तरुणाच्या कल्पकतेतून झाले असून, त्याने संपूर्ण देशाच्या राजकारणाची गणिते बदलून टाकली आहेत.

​”A political front of the youth, by the youth, for the youth” (तरुणांची, तरुणांद्वारे, तरुणांसाठी चालवलेली राजकीय आघाडी) असे ब्रीदवाक्य घेऊन आलेल्या या व्यासपीठाने देशातील सुशिक्षित बेरोजगार, पेपरफुटीने त्रस्त झालेले विद्यार्थी आणि प्रस्थापितांच्या राजकारणाला कंटाळलेल्या सामान्य नागरिकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. आजवर ज्या तरुणाईला राजकीय पक्ष केवळ मतांचे गणित आणि सोशल मीडियावर ट्रेंडींग करण्यासाठी वापरत होते, त्याच तरुणाईने आता स्वतःचे हक्काचे व्यासपीठ उभे केले आहे. अवघ्या ५४ पोस्टमध्ये ११ मिलियन फॉलोअर्सचा आकडा गाठणे, ही केवळ भारताच्या नव्हे, तर जागतिक डिजिटल इतिहासातील सर्वात वेगाने वाढलेली चळवळ ठरली आहे. सोशल मीडियावरील हा आकडा निव्वळ ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’ पुरता मर्यादित नसून, तो प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.

​या चळवळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला मिळालेला सर्वसमावेशक पाठिंबा. देशभरातील नामवंत पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गजांनी या चळवळीच्या ताकदीचे कौतुक केले आहे. देशातील आजचा तरुण जात, धर्म, प्रांतिक अस्मिता या पलीकडे जाऊन केवळ आपल्या अस्तित्वासाठी, रोजगारासाठी आणि सन्मानासाठी या अनोख्या झेंड्याखाली एकत्र आला आहे. कोणताही कोट्यवधींचा राजकीय फंड नाही, कोणताही गॉडफादर नाही आणि कोणताही पारंपरिक वारसा नाही; तरीही एका मराठी मुलाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या डिजिटल बंडाने देशातील सर्वात मोठ्या आयटी सेल आणि राजकीय धुरिणांना पुरते कोड्यात पाडले आहे. ‘डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ यूथ’ (तरुणांच्या ताकदीला कमी समजू नका) हा संदेश आता केवळ एक घोषणा राहिलेला नाही, तर तो या देशातील प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला थेट इशारा ठरला आहे.

​या चळवळीचा वाढता झंझावात पाहून प्रस्थापित पक्षांच्या गोटात कमालीचा संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजवर केवळ घोषणाबाजीवर तरुणांची दिशाभूल करणाऱ्या राजकारण्यांना आता जमिनीची वास्तविकता समजून घेण्याची वेळ आली आहे. सोशल मीडियाच्या भिंती ओलांडून आता ही चळवळ थेट रस्त्यांवर उतरून प्रस्थापित सत्तेला आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट चिन्हे आहेत. महाराष्ट्राच्या मातीने नेहमीच देशाला नवी दिशा दाखवली आहे, आणि आज पुन्हा एकदा एका मराठी तरुणाने देशातील कोट्यवधी तरुणांच्या हाताला आणि विचारांना एकत्र आणून एक नवा इतिहास रचला आहे. ही अभूतपूर्व डिजिटल क्रांती आगामी काळात देशाची संपूर्ण सामाजिक आणि राजकीय रचना कशी बदलून टाकते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??