आपला जिल्हाक्राईम न्युजताज्या घडामोडी

पिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासन यांची संयुक्त कारवाई

पिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासन यांची संयुक्त कारवाई

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क*

राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या निर्देशानुसार 21 जून रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.2, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार तसेच अन्न औषध प्रशासनचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या समवेत पिरवाडी येथे जाऊन संशयित हातभट्टी दारू विक्री करण्याऱ्या बेबी रवी मछले ही महिला विनापरवाना अवैधपणे देशी व विदेशी दारू विक्री करताना मिळून आल्याने या महिलेविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

पिरवाडी गावातील बेबी रवी मछले या महिलेवर सन 2025 पासून ते आजअखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण 11 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. 

या कारवाईवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सर्वश्री व उपनिरीक्षक पी.आर. खरात, के.एस. पाटील, उप-निरीक्षक, यु.जी. कांबळे, उप-निरीक्षक, ए.टी. घोसाळकर, उप-निरीक्षक, एस.डी. राजगुरू, उप-निरीक्षक, पांडुरंग घुगे, अन्न सुरक्षा अधिकारी, श्रद्धा साळुंके, अन्न सुरक्षा अधिकारी, पोलीस अंमलदार प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण करवीर पोलीस ठाणे तसेच राज्य उत्पादन शुल्क, जवान सर्वश्री देवेंद्र पाटील, संदीप हालुंडे, संदेश कोळी, आशिष पोवार, सुशांत पाटील, आदर्श धुमाळ आणि सरपंच अनिता खोत आणि पोलीस पाटील राजश्री जाधव उपस्थित होते.

गावठी हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व ग्रामपंचायातींनी ग्रामरक्षक दलाची स्थापना करावी तसेच अवैध गावठी हातभट्टी दारूची विक्री, निर्मिती किंवा वाहतूक याची माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र.18002339999 या क्रमांकावर किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या 8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??