जयसिंगपुरात श्री जय तुळजाभवानी मंदिराची भूमिपूजन पायाभरणी संपन्न

जयसिंगपुरात श्री जय तुळजाभवानी मंदिराची भूमिपूजन पायाभरणी संपन्न
जयसिंगपूर : एन वाय नवा भारत डिजिटल नेटवर्क :
शहरातील शिंदे – खामकर मळा 7 वी गल्ली येथे जय तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्ट गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ठीक दुपारी सव्वा 1 वाजनेच्या दरम्यान पायाभरणी शुभारंभ श्री.ष.ब्र.सदगुरु शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, भागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग , विविध क्षेत्रातील उद्योगपती, मान्यवर, डॉक्टर्स व भागातील महिला मंडळ ,आजी – माजी नगरसेवक यांच्यासह जयसिंगपूर, चिंचवाड , हरिपूर, सांगली येथील विविध क्षेत्रातील मान्यवर नेतेमंडळी,मित्र मंडळी उपस्थित होते.
भुमीपूजन व पायाभरणी शुभारंभ दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली.अतिशय सुंदर अशी आखिव रेखीव श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर या ठिकाणी उभारण्यात येत असून अवघ्या वर्षभरात मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार आहे.येणाऱ्या सन 2026 सालचे नवरात्र उत्सव या ठिकाणी विविध कार्यक्रमाने भव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे माजी नगरसेवक बजरंग खामकर व युवा उद्योजक मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष खामकर यांनी सांगितले आहे.