आसियान परिषदेत समावेशिता आणि स्थिरतेवर भर: प्रधानमंत्री मोदींचा आसियान-भारत संबंध मजबूत करण्याचा निर्धार

आंतरराष्ट्रीय बातम्या-
आसियान परिषदेत समावेशिता आणि स्थिरतेवर भर: प्रधानमंत्री मोदींचा आसियान-भारत संबंध मजबूत करण्याचा निर्धार
वृत्तसेवा/एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघ (आसियान) च्या 47व्या शिखर परिषदेला मलेशियाच्या कुआलालंपुर शहरात भव्य प्रारंभ झाला. या वर्षी “समावेशिता आणि स्थिरता” हा परिषदेमधील मुख्य विषय आहे. आसियानचे अध्यक्ष व मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या अध्यक्षतेखाली हा तीन दिवसांचा महत्वाचा शिखर मेळावा होत आहे.ताज्या घटनांमध्ये तिमोर-लेस्ते या नव्या देशाचा आसियानमध्ये अधिकृत समावेश झाला असून संघटनेचे सदस्य देश आता ११ झाले आहेत. हा निर्णय उद्घाटन सत्रात घेतला गेला व घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल सहभाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, भारत आणि आसियान मिळून जगातील जवळपास एक-चतुर्थांश लोकसंख्या प्रतिनिधीत्व करते. ते म्हणाले की, भारत आणि आसियान भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नात्यांनी एकमेकांशी जोडले आहेत. सद्याच्या अनिश्चिततेच्या काळातही भारत-आसियान भागीदारी प्रगतीपथावर असून जागतिक स्थिरतेसाठी ती मजबूत आधार म्हणून निर्माण झाली आहे. मोदींनी २०२६ साल ‘आसियान-भारत समुद्री सहकार्य वर्ष’ म्हणून साजरे होईल, असेही जाहीर केले.या परिषदेत क्षेत्रीय आर्थिक एकत्रिकरण, सुरक्षा, व्यापार आणि सहकार्याच्या विविध स्तरांवर चर्चा होणार आहे. तसेच, मलेशिया सरकारच्या यजमानपदामुळे या बैठकीला विशेष महत्त्व मिळाले आहे. परिषदेसोबतच, भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे पुढील उपसमित्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत


