आपला जिल्हाताज्या घडामोडी

आमदार यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ नगरपरिषदेला अग्निशमन गाडी सुपुर्द 

संत सेना महाराज नाभिक समाजाच्या हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न

आमदार यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ नगरपरिषदेला अग्निशमन गाडी सुपुर्द 

शिरोळ / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना नगरपरिषद अग्निशमन सेवा व जिल्हास्तरीय आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत ७६ लाख ५५ हजार रुपये किमतीची अत्याधुनिक अग्निशमन गाडी शिरोळ नगरपरिषदेला प्रदान करण्यात आली. या वाहनाचे लोकार्पण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. 
 शिरोळ परिसरातील नागरिकांसाठी ही अग्नीशामक सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान १४ लाख २९ हजार रुपयांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या येथील संत सेना महाराज नाभिक समाजाच्या हॉलचा उद्घाटन सोहळा देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
   या कार्यक्रमात बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गे लावली जात आहेत. प्रामुख्याने शिरोळ शहराची पाणी योजना, भुयारी गटार योजना यासह विविध विकासकामे जोमाने सुरू आहेत. ही विकास कामे करीत असताना शहराच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून शहराला अग्निशमन गाडी सुपूर्द करण्यात आली आहे. यासह नाभिक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील मी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रतापसिंह उर्फ बाबा पाटील, गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने-देशमुख, माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने, रणजितसिंह पाटील, विजयसिंह माने-देशमुख, नगरपरिषदेचे अभियंता सुहेब काझी, साहिल जमादार, आशुतोष प्रधान, साहिल मकानदार, धैर्यशिल पाटील, रामदास गावडे, बजरंग काळे, माजी सरपंच अर्जुन काळे, गोरखनाथ माने, एन. वाय. जाधव, रावसाहेब पाटील, दिग्विजय माने, संदिप चुडमुंगे, सुरज कांबळे, किरण माने-गावडे, सचिन माळी, यांच्यासह नाभिक समाजाचे समाजबांधव, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिरोळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??