एकरकमी विनाकपात ३४०० रुपये देणार: गणपतराव पाटील -श्री दत्त (शिरोळ) ५४ वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात 
शिरोळ:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२५-२०२६ च्या ५४ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी ११.४५ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी ११-०० वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभहस्ते काटापूजन करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करुन देशातील विविध ठिकाणी असलेल्या ऊस दराची माहिती दिली. सदरचे दर पहाता आपल्या जिल्ह्यातील ऊसाचे दर हे सर्वात जास्त आहेत. केंद्र शासनाने एफआरपी रकमेमध्ये प्रतीवर्षी वाढ केली आहे. परंतू सन २०२१ मध्ये जाहीर केलेली प्रती क्विंटल रुपये एकतीशे या एमएसपी दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्व साखर कारखानदारांना उसाची एफआरपी रक्कम देणे अत्यंत जिकीरीचे होत असल्याचे सांगितले. हा सिझन कारखान्याच्या दृष्टीने महत्वाचा असून आपण सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला पाठवून द्यावा अशी विनंती केली. यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. केंद्र शासनाने प्रतीवर्षी जाहीर केलेली एफआरपी रक्कम एकरकमी आदा केली आहे. दत्त कारखाना हा आपलाच कारखाना आहे. आम्ही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करीत आहोत. सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी आमच्या कारखान्याने ठिकठिकाणी मेळावे घेवून सभासदांना मार्गदर्शन केले आहे. आज जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढविणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. त्यासाठी आम्ही ऊस विकासाच्या विविध योजना राबवून शास्त्रज्ञांच्यामार्फत सातत्याने सभासदांना मार्गदर्शन केले आहे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज चालू आहे. गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे. या हंगामासाठी एकरकमी प्रतिटन रुपये ३४००/- इतकी विनाकपात देणार आहोत. तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना सत्वर देईल. या हंगामात कारखान्याने १५ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली.     
यानंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा यांनी आमच्या कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवली असून सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली व सर्व उपस्थितांचे आभर मानले.                                                       याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, इंद्रजित पाटील, रणजित कदम, बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, अमर यादव, दरगू गोपाळ माने-गावडे, जोतीकुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, विजय सुर्यवंशी, महेंद्र बागे, संचालिका सौ. संगिता पाटील-कोथळीकर, सौ. अस्मिता पाटील, बाळासाहेब पाटील-हालसवडे, मलकारी तेरदाळे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर मेस्त्री, कामगार संचालक प्रदिप बनगे यांचेसह ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी, मौजे आगर चे माजी सरपंच अमोल चव्हाण, नांदणी बँकेचे चेअरमन आप्पासाहेब लठ्ठे, बापूसो परीट, पंचगंगा कारखान्याचे संचालक बाबा पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गजानन चव्हाण, तुकाराम पाटील, फत्तेसिंह मोरे, दादासो कोळी, युवराज पुजारी, पिंटू पाटील, बंडू शिंदे, संदिप हवालदार, अशोक पाटील, आप्पासो पाटील, आण्णासो पाटील, बाबासाहेब उर्फ राजू पाटील, महादेव अपिणे, चंद्रकांत लंगोटे, काकासो पाटील, आनंदा कुलकर्णी, सुरेश पाटील, दिलीप चवगोंडा पाटील, दिनकर नरुटे, सुरेश कागले, वसंत नरुटे, प्रमोद कागले, विठ्ठल सुर्यवंशी, रावसाहेब गळतगे, रघुनाथ पाठक, प्रकाश पाटील, काका खुरपे, दादासाहेब पाटील, रमेश पाटील, प्रकाश परीट, लक्ष्मण हिंदळकर, कुमगोंडा पाटील, जयसिंगपूर-उदगांव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील व त्यांचे पदाधिकारी, गणपती धनवडे, सुनिल पाटोळे, राजाराम माने, कामगार युनियनचे माजी अध्यक्ष रावसाहेब भोसले, जोतीराम दबडे व कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, ऊर्जाकुर श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी, कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू, कार्यकर्ते, हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
			
		 
				
		
		
		
		
	
	
	
	
 
	
	
	
	  
		
		
		
			
			Back to top button
		
	
		 
		
	
	
	 
 
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??