क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

राज्यस्तर रग्बी असोसिएशन स्पर्धेत रेडियंट स्कूल प्रथम

राज्यस्तर रग्बी असोसिएशन स्पर्धेत रेडियंट स्कूल प्रथम

कोल्हापूर: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

पुणे (बालेवाडी) येथे रग्बी असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र टच रग्बी अजिंक्यपद स्पर्धा झाल्या. यामध्ये दहा वर्षाखालील मुले-मुली व तेराव्या सबज्युनिअर अस्मीता खेलो इंडिया राज्यस्तरीय रग्बी चॅम्पियनशिप स्पर्धेत कोदवडे (ता. राधानगरी) येथील रेडियंट स्कूलच्या मुले आणि मुली दोन्ही संघांनी राज्य विजेतेपद पटकावले.

दहा वर्षाखालील राज्य विजेत्या मुलींचा संघ असा 

शुभ्रा सुनील जाधव, संस्कृती धनाजी कदम, प्रचिता संदीप पाटील, आराधना साताप्पा पाटील, श्रद्धा संदीप कांबळे, नियती यशवंत सुतार, ज्ञानेश्वरी सुहास वरुटे, आराध्या रवींद्र सुतार, सई सरदार भोसले, आराध्या अनिल देसाई, जान्हवी प्रभाकर धामणे, शर्वरी महादेव पाटील.

चौदा वर्षाखालील गटात खेलो इंडिया स्पर्धेत राज्य विजेत्या विद्यार्थिनी अशा :

श्रेया अनिल पाटील, अदिती अशोक पाटील. यांना दीपक पाटील यांचे मार्गदर्शन व संदीप पाटील यांचे प्रशिक्षण मिळाले.

दहा वर्षाखालील मुलांच्या संघातून करण सुरेश पाटील, सत्यम मानसिंग पाटील, श्रीवर्धन विजयकुमार आडके, राजवीर राजदीप पाटील, पलाश मारुती पाटील, हर्ष संभाजी पाटील, देवकण रवींद्र पाटील, वरद दिनेश चौगुले, दुष्यंत प्रदीप चौगुले, करण दशरथ संकपाळ, श्रीराज संभाजी पाटील, अथर्व एकनाथ पाटील हे विद्यार्थी खेळले.

त्यांना संदीप पाटील यांचे प्रशिक्षण व दीपक पाटील रेडियंटचे प्राचार्य आर. जी. पाटील, सचिव राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व संदीप पाटील यांचे प्रशिक्षण मिळाले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??