ताज्या घडामोडीराजकीय

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होणारच ! राजू शेट्टी

शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात निर्धार:

गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द होणारच ! राजू शेट्टी

शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात निर्धार:

ईश्वरपूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

ईश्वरपूर ता. वाळवा येथील राजारामबापू नाट्यगृहात वाळवा तालुक्यातील शेती बचाव संघर्ष समिती व शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्यावतीने जाहीर मेळावा घेण्यात आला. वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी शक्तीपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी वज्रमुठ केली आहे. वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठावरील मसुचीवाडी पासून ते वारणा नदीवरील चिकुर्डे पर्यंतच्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी या महामार्गास कडाडून विरोध केला आहे.

एकेकाळी वाळवा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. या तालुक्यातील क्रांतीकारी शेतकऱ्यांनी साखर कारखाने व सहकारी संस्थांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून हजारो एकर शेती ओलिताखाली आणण्याचे काम केले आहे.

गेली चार दशके या तालुक्यातील शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून ख-या अर्थाने हरितक्रांती केलेली आहे. वाळवा तालुक्यातील लोकांनी हजारो कोटींच्या कर्जातून शेकडो पाणीपुरवठा संस्था निर्माण करून सर्व शेती बागायती केल्या आहेत.

वाळवा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग गेल्यास कृष्णा व वारणा नदीच्या काठांवर जवळपास ४० ते ६० फुटाचा भराव केला जाणार आहे. यामुळे महापुराचा धोका निर्माण होणार असून सर्वाधिक जमीनी क्षारपड होणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातील सत्तेच्या साठमारीत ७० हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी गरज नसलेला १ लाख कोटीचा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील जनतेच्या माथी मारला जात आहे. पुर्वीच्या महामार्गात ८०२ किलोमीटर ऐवजी ८५६ किलोमीटर वाढीव प्रकल्प करून १४ हजार कोटींचा प्रकल्प खर्च वाढविण्यात आला आहे.

शक्तीपीठ महामार्गातील वाढीव रस्त्यासाठी माण खटाव सारख्या फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यास २५४.५४ कोटी रूपये खर्च करत आहेत. राज्यातील १३ ही जिल्ह्यातून या महामार्गास शेतकरी कडाडून विरोध करू लागले आहेत. जनतेच्या डोक्यावर १ लाख कोटींचे कर्ज करून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्गास इतका विरोध होवू लागला आहे की शक्तीपीठ महामार्ग हे देवेंद्र फडणवीसांचे दिवास्वप्न ठरणार आहे.

यावेळी आमदार जयंत पाटील , मा. आमदार मानसिंगराव नाईक, जयंत पाटील साहेब अभिजीत पाटील (जिल्हाध्यक्ष शिवसेना उबाठा)रघुनाथदादा पाटील, भाई भारत पाटणकर, शामराव पाटील आण्णा , आनंदराव मलगुंडे , धनाजी गुरव सर , बी जी पाटील ,दिपक कोठावळे, सुहास पाटील, शामराव पाटील, भागवत जाधव, विजय महाडिक , दिग्विजय पाटील जे एस पाटील यांच्यासह वाळवा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??