ताज्या घडामोडी

गझल मंथन संस्थेतर्फे  7 जूनला मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

गझल मंथन संस्थेतर्फे  7 जूनला मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गझल प्रचार आणि प्रसार यासाठी सदैव कार्यरत असणार्‍या गझल मंथन साहित्य संस्थेद्वारा येत्या ७ जून २०२६ रोजी आयोजित पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा गझलकार गोपाल मापारी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून युवा गझलकार चेतन पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. युवा गझलकार विशाल मोहिते यांना संस्थेचा ‘युवा गझलकार – २०२६’ हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

 या संमेलनाचे उद्घाटक म्हणून युवा गझलकार स्वप्नील शेवडे उपस्थित राहणार असून गझलनवाज भीमराव पांचाळे यांना ‘गझल मंथन जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाद जोशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून सुधीर महाजन, रवींद्र यशवंतराव(देशमुख) , डॉ गिरीश इंगळे, प्रा.हेमंत सामंत उपस्थित राहणार आहेत.

 गझल मंथन साहित्य संस्थेने खास युवा गझलकारांसाठी युवा स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेतील सहभागींच्या गझलयात्री संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना संमेलनात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गझलयात्री संग्रह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

 संमेलनात ज्येष्ठ गझलकारांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच चर्चासत्र आणि 5 दर्जेदार मुशायरे संपन्न होणार असून सर्व गझल रसिकांनी या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आले आहे. 

या संमेलनाचे आयोजन संस्थेच्या मुंबई कार्यकारिणीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे मार्गदर्शक डॉ शिवाजी काळे, डॉ स्नेहल कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, महाराष्ट्र समन्व्यक प्रणाली म्हात्रे आणि मुंबई कार्यकारिणी अध्यक्षा योगिता तकतराव यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??