ताज्या घडामोडी

खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

संतप्त पत्रकारांचा पत्रकार  परिषदेवर बहिष्कार राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया

खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी .

संतप्त पत्रकारांचा पत्रकार  परिषदेवर बहिष्कार राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया

मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या आणि जनतेचा आवाज बनणाऱ्या पत्रकारांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्याचा अत्यंत निंदनीय प्रकार ईशान्य मुंबईचे नवनिर्वाचित खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून घडला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच उडी मारलेल्या या लोकप्रतिनिधीची भाषा ऐकून संपूर्ण माध्यम जगत हादरून गेले आहे. सत्तेची ऊब मिळताच पत्रकारांवर अशा प्रकारे दादागिरी करणाऱ्या या बेताल खासदाराच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या स्वाभिमानाची आणि संतापाची लाट उसळली आहे.​आपल्या राजकीय भूमिकेवर आणि पक्षांतरावर प्रश्न विचारण्यासाठी आलेल्या पत्रकारांना पाहून खासदार संजय दिना पाटील यांचा संयम इतका सुटला की त्यांनी कॅमेऱ्यासमोरच अत्यंत अश्लील आणि हिंसक भाषेचा वापर केला. “पुन्हा माझ्या दारात आलात तर जीवे मारीन,” अशी उघड धमकी त्यांनी दिली. एका जबाबदार खासदारानेअत्यंत खालच्या पातळीवरील आणि अरेरावीच्या भाषेत जाहीरपणे पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. राजकीय प्रश्न विचारल्याचा एवढा राग आला की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच या लोकप्रतिनिधीने कॅमेऱ्यासमोर आपली गुंडशाही वृत्ती दाखवून दिली. सत्तेची ऊब मिळताच पत्रकारांवर अशा प्रकारे दादागिरी करणाऱ्या या बेताल खासदाराच्या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या स्वाभिमानाची आणि संतापाची लाट उसळली आहे. पत्रकारांना अशा प्रकारे गुंडगिरीच्या भाषेत धमकावणे, हा थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. या उद्धट वर्तनाचा निषेध म्हणून मुंबईसह राज्यभरातील पत्रकारांनी एकत्र येत खासदार पाटील यांनी डॅमेज कंट्रोलसाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेवर कडकडीत बहिष्कार टाकला. पत्रकारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर नतमस्तक होत खासदारांना एका व्हिडिओद्वारे हात जोडून माफी मागावी लागली. पण, हा केवळ एक सोपस्कार आहे की मनातून व्यक्त केलेली दिलगिरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.​दसरीकडे, या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर राजकीय वळण मिळाले असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट गृहखात्याकडे धाव घेतली आहे. संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून, खासदार पाटील यांनी भूतकाळात नेमके कोणते पाच खून केले आहेत आणि ते कोणाच्या पाठिंब्याने केले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या वक्तव्यातून त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि हिंसक मानसिकता उघड होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही केवळ संजय राऊत यांच्यावर केलेली वैयक्तिक टिप्पणी असल्याचे सांगत प्रकरणाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीचे मित्रपक्ष असणारे बच्चू कडू यांनी मात्र पत्रकारांची नाराजी दूर करण्यासाठी स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली आहे.​एका बाजूला नेत्यांकडून पत्रकारांची समजूत काढण्याचे आणि वाद शांत करण्याचे राजकीय प्रयत्न सुरू असले, तरी पत्रकार संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ एका व्हिडिओ माफीनाम्यावर हा विषय थांबणार नाही. लोकशाहीच्या रक्षकांवर जाहीरपणे हात उचलण्याची भाषा करणाऱ्या लोकप्रतिनिधीला कायद्याचा धाक दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे गृहखाते आणि पोलीस प्रशासन या मुजोर लोकप्रतिनिधीवर खरोखर ठोस कायदेशीर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार, की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हे प्रकरण कायमचे दडपले जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??