आपला जिल्हाताज्या घडामोडी

आवाडे-यड्रावकर विवाह सोहळा शाही थाटात संपन्न

आवाडे-यड्रावकर विवाह सोहळा शाही थाटात संपन्न

इचलकरंजी: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

राजकीय, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिग्गज असलेल्या आवाडे व यड्रावकर या दोन कुटुंबाचा शाही सोहळा रविवारी पार पडला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची पणती, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची नात आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां.सानिका आणि सहकाररत्न कै. शामराव पाटील-यड्रावकर यांचे नातू आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे चि. अजय यांचा शुभविवाह सोहळा शाही थाटात संपन्न झाला.

नववधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अलोट गर्दीत मोठ्या थाटामाटात हा शुभविवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी नामदार चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सर्वश्री विनय कोरे, विश्‍वजीत कदम, शिवाजी पाटील, गोपीचंद पडळकर, सतेज पाटील, सत्यजित देशमुख, अमल महाडीक, चंद्रदीप नरके, राजेश क्षिरसागर, अशोक माने, इद्रीस नायकवडी, जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार शाहू महाराज छत्रपती, विशाल पाटील, धैर्यशील माने, धनंजय महाडीक, संभाजीराजे छत्रपती, कृष्णराज महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे, प्रा. संजय मंडलिक, श्रीमती निवेदिता माने, राजू शेट्टी, दैनिक पुढारी चे संपादक प्रतापसिंह जाधव, कार्यकारी संपादक योगेश जाधव, सुरेश हाळवणकर, गणपतराव पाटील, अशोक स्वामी, भालचंद्र पाटील, वैभव नायकवडी, संजय घाटगे, संजय घोडावत, पी. एम. पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माधवराव घाटगे, अरुण इंगवले, उल्हास पाटील, विश्वास पाटील, रजनीताई मगदूम, श्रीमती जयश्री पाटील, कणेरी मठाचे प.पु. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, अरुण डोंगळे, प्रतापसिंह देसाई, सुजित मिणचेकर, ए. वाय. पाटील, समित कदम यांच्यासह या विवाह सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून तसेच सीमावर्ती भागातून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बबन यादव यांनी केले.

उपस्थितांचे स्वागत माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, उत्तम आवाडे, स्वप्निल आवाडे, नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, आदित्य पाटील-यड्रावकर, सौ. किशोरी आवाडे, सौ. मौश्मी आवाडे, सौ. स्वरुपा पाटील-यड्रावकर, सौ. त्रिशला पाटील-यड्रावकर आदींनी केले. नव वधू-वर यांचे ढोल-ताश्यांच्या गजरात बगगीतून आगमन झाले. पारंपरिक विधी आणि मंगलाष्टकांच्या गजरात विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी वधू-वरांना शुभेच्छांचा वर्षाव करत नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. विवाहस्थळी आकर्षक फुलांची सजावट, भव्य मंडप, देखणी प्रकाश योजना आणि दिमाखदार मंच उभारण्यात आला होता. कार्यक्रमस्थळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पाहुण्यांसाठी पारंपरिक व विविध प्रकारच्या भोजनाची खास व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक व्यवस्थाही सुरळीत राहावी यासाठी पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांनी विशेष नियोजन केले होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??