डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार डॉ. अरुणा रॉय यांना, समाजकार्य पुरस्कार श्री. विद्याधर अनास्कर यांना तर युवाप्रेरणा पुरस्कार पूजा दानोळे हिला जाहीर

डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार डॉ. अरुणा रॉय यांना, समाजकार्य पुरस्कार श्री. विद्याधर अनास्कर यांना तर युवा प्रेरणा पुरस्कार पूजा दानोळे हिला जाहीर
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शिरोळ तालुका आणि परिसरातील शेतकरी उन्नत व्हावा हा ध्यास घेऊन स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील हे आपल्या आयुष्याची सात दशकांहून अधिक काळ या परिसरात कार्यरत राहिले. त्यांनी सहकार-कृषी-औद्योगिक समाज्रचनेद्वारे व समाजवादी मूल्ये अंगीकारून या परिसरात अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून त्या चांगल्या पद्धतीने व कार्यक्षमतेने चालवल्याही. याचबरोबर त्यांनी शिरोळ तालुक्याचे विधानसभेत १५ वर्षे प्रतिनिधित्वही केले. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जावा व पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या हेतूने त्यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य, उद्योग व क्रीडा या क्षेत्रात लोककल्याणाच्या समर्पित भावनेने कार्यरत असणाऱ्या तीन महनीय व्यक्तींना गौरविले जाते. सन २०१५ पासून त्यांच्या स्मृती दिनानिमित्त सदर पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण केले जात आहे.
यावर्षी निवड समितीच्या तीन बैठका पार पडल्या. यामध्ये देश व राज्यपातळीवर वर नमूद असलेल्या क्षेत्रात मान्यवरांच्या नावांवर चर्चा होऊन निवड समितीने यावर्षी तीन व्यक्तींना पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.

डॉ अरुणा रॉय
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार डॉ. अरुणा रॉय माहितीचा अधिकार व ग्रामीण विकास मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु. १ लाख

विद्याधर अनासकर
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार श्री. विद्याधर अनास्कर सहकार व बँकिंग मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रु. ५० हजार

पूजा दानोळे
डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार कु. पूजा दानोळे
सदरच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना डॉ. गणेश देवी – प्रख्यात साहित्यिक यांच्या हस्ते व डॉ. यशवंतराव थोरात माजी अध्यक्ष, नाबार्ड यांच्या अध्यक्षतेखाली ११ व्या स्मृती दिनानिमित्त बुधवार दि. ०१ एप्रिल २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता गौरविले जाणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष श्री. विनोद शिरसाट यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री. गणपतराव पाटील, आमदार श्री. अशोकराव माने, कारखान्याचे चेअरमन श्री. रघुनाथ पाटील, व्हा. चेअरमन श्री. शरदचंद्र पाठक, शिरोळचे उपनगराध्यक्ष श्री. पृथ्वीराज यादव, माजी संपादक श्री. वसंत भोसले, समिती सदस्य श्रीमती सुजाता शिंदे, श्री. महादेव धनवडे, श्री. चंगेजखान पठाण, श्री. सर्जेराव पवार, श्री. आप्पा पाटील, श्री. चंद्रकांत जाधव-घुणकेकर, श्री. आप्पासाहेब लड्डे, श्री. गुंडाप्पा पवार, श्री. विलास कांबळे, सौ. स्वाती सासणे, श्री. अनंत धनवडे, श्री. शेखर पाटील इ. उपस्थित होते.



