आपला जिल्हाताज्या घडामोडी

संजीवन विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी; विविध उपक्रमांचे आयोजन

संजीवन विद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी; विविध उपक्रमांचे आयोजन

पन्हाळा : प्रसाद जाधव /एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

​येथील संजीवन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य श्री. महेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील वरिष्ठ शिक्षक प्रा. सुनील हुजरे यांचे ‘शाहूंचे कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

​आपल्या व्याख्यानातून त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे बालपण, शिक्षण आणि त्यांनी केलेले समाजोपयोगी कार्य याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केलेली छत्रपती शाहू महाराजांची वेशभूषा होती. कार्यक्रमादरम्यान शिक्षिका स्मिता पाटील व विद्यार्थिनींनी पारंपरिक ओवी गायन केले, तसेच विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिक्षिका नीता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी संजीवन विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??