जिल्ह्यात छत्रपती शाहू जयंती उत्साहात साजरी

जिल्ह्यात छत्रपती शाहू जयंती उत्साहात साजरी:
संजीवन विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
पन्हाळा : प्रसाद जाधव/एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन विद्यानिकेतन शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापक के. के. पोवार आणि शिक्षकांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी इयत्ता सहावीचा विद्यार्थी संकल्प देशमुख याने ‘शाहू महाराजांचा कारभारी’ या भूमिकेतून संवाद साधत विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहण्याचे व व्यायाम करण्याचे आवाहन केले. इयत्ता सातवीतील प्रसन्नजीत पोवार याने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भाषण केले, तर मुख्याध्यापक के. के. पोवार यांनी महाराजांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगितले. कार्यक्रमात इयत्ता नववीतील सुवर्णजीत देसाई याने शाहू महाराजांची वेशभूषा साकारली होती.
याच सोहळ्यात नाट्य अभिनय स्पर्धेतील विजेत्या बालकलाकारांचा सन्मान करण्यात आला, तसेच नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळ व वर्ग प्रतिनिधींचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी विद्यार्थी प्रतिनिधी वीर सातव आणि संस्कृती गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जाधव आणि महेंद्र कुलकर्णी यांनी केले. सोहळ्याला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते
प्रबोधिनीत शाहूराजांना अभिवादन
इचलकरंजी : प्रतिनिधी

२६ राजेशाही आणि संस्थानिकांच्या कालखंडातील लोकराजा म्हणून बहुमोल कामगिरी करणारे आणि सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणारे छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवरायानंतरच्या लोकनिष्ठ राजांपैकी एक महत्त्वाचे लोकराजे होते. रयतेचे राज्य ही संकल्पना खऱ्या अर्थाने रुजविणारे ते राजे होते.महाराष्ट्र व भारत खऱ्या अर्थाने संपन्न करायचा असेल तर छत्रपती शिवराय आणि शाहू- फुले -आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गानेच आपल्याला वाटचाल नकरावी लागेल. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले . प्रारंभी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे सचिव संजय भस्मे यांच्या हस्ते आणि डॉ.आंबेडकर विकास संस्थेचे प्रमुख ललित बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे , पांडुरंग पिसे,महेंद्र जाधव, प्रभा यादव, अश्विनी अहिवळे, अमोल कदम, आनंदा कांबळे, बाबासाहेब वडवे,अशोक भोसले, सुनील कांबळे, संजीव आगळे आदी उपस्थित होते.
शिरोळ:प्रतिनिधी

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ
येथे शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीमती माणिक नागावे यांच्या व क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगितली.तसेच क्रीडाश्री अब्दुल कादर देसाई सरांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर महत्वपूर्ण माहिती सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन केले. तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा संघटक श्री.सुरेश सकटे यांच्या सहकार्याने
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या “नशामुक्त भारत अभियानांतर्गत” “आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी दिन” साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम,वाढती व्यसनाधीनता त्यामुळे होणारे सामाजिक, आर्थिक व आरोग्यविषयक दुष्परिणामांविषयी माहिती व्हावी यासाठी व्यसनाविरोधी घोषणा देत जनजागृती फेरी काढली.तंबाखू मुक्ती व नशाबंदी ची शपथ सहाय्यक शिक्षक श्री रियाज जमादार सरांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी हजर होते.



